कल्याण, डोंबिवलीमध्ये अनेक ठिकाणी पूरस्थिती, मदतकार्य सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2019 02:59 PM2019-07-27T14:59:07+5:302019-07-27T14:59:48+5:30
मुसळधार पावसामुळे कल्याण आणि डोंबिवलीमध्येही पूरस्थिती निर्माण झाली आहे.
कल्याण - मुसळधार पावसामुळे कल्याण आणि डोंबिवलीमध्येहीपूरस्थिती निर्माण झाली असून, अनेक ठिकाणी पाणी साठल्याने लोक अडकून पडले आहे. दरम्यान, पुरात अडकलेल्यांची सुटका करण्यासाठी बचाव पथक आणि हेलिकॉप्टरला पाचारण करण्यात आले आहे.
कल्याण येथील म्हारळ मध्ये उल्हास नदीचे पाणी साचले आहे. बैठ्या चाळी पूर्णपणे पाण्याखाली गेल्या आहेत. इमारतीच्या पहिल्या मजल्या पर्यंत पाणी साचले आहे. तसेच वरप, कांबा गावात पाणी भरले आहे. येथील स्थानिक आपला जीव वाचविण्यासाठी इमारतीच्या छतावर गेले आहेत. वरप येथील पेट्रोल पंप वरील छतावर 80 जण अकडले आहेत. त्याची सुटका करण्यासाठी हेलिकॉप्टर ची व्यवस्था केली आहे. आता हेलिकॉप्टर वरप ठिकाणी पोहचले आहे.
तर डोंबिवलीमदील खाडीकिनारीही पुरस्थिती निर्माण झली आहे. पश्चिमेतील कोपर,डोंबिवली, ठाकुर्ली खाडी परिसर पाण्याखाली गेला आहे.चाळीत लोक अडकलेली आहेत, तर काहींना बाहेर काढयाला सुरवात करण्यात आली आहे.डोंबिवलीमध्ये सुद्धा एनडीआरएफ टीम दाखल झाली आहे.