गायमुखचे मेट्रो कारशेड उद्योगपती वाडियांच्या हितासाठी
By admin | Published: July 5, 2017 06:22 AM2017-07-05T06:22:17+5:302017-07-05T06:22:17+5:30
घोडबंदर येथील प्रस्तावित मेट्रोचे प्रस्तावित कारशेड गायमुख येथे उद्योगपती वाडिया यांच्या हितासाठी हलविण्याच्या एमएमआरडीएच्या
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : घोडबंदर येथील प्रस्तावित मेट्रोचे प्रस्तावित कारशेड गायमुख येथे उद्योगपती वाडिया यांच्या हितासाठी हलविण्याच्या एमएमआरडीएच्या निर्णयास स्थानिक शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केला आहे. या निर्णयाने शेतकऱ्यांचे नुकसान होऊन गो एअरचे मालक वाडिया यांचा मोठा होणार असल्याचा आरोप या आशयाचे पत्रदेखील त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे.
कासारवडवली येथील मेट्रो कारशेडवर अद्यापही तोडगा निघत नसल्याने आणि गायमुख येथे कारशेड तयार केल्यास पुढे दहिसरला तेथून कनेक्टीव्हीटी मिळू शकेल, या उद्देशाने ते गायमुख येथे हलविण्याच्या हालचाली एमएमआरडीए आणि पालिकेकडून सुरु झाल्या आहेत. या प्रक्रियेसंदर्भात पालिकेने दुजोरा दिला असतांना आता या नव्या कारशेडलाच सरनाईक यांनी विरोध केला आहे. मेट्रो कारशेडचे आरक्षण पडल्यानंतर स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध केला असता आपण स्वत: जागेवर उभे राहून एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करून सर्वेक्षण पूर्ण करून
घेतल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे एकीकडे कासारवडवली येथील शेतकऱ्यांना योग्य मोबदला देऊन जमीन हस्तानंतरणाची प्रक्रि या सुरु असताना अचानक गायमुख येथील गो एअर कंपनीचे मालक वाडिया यांच्या जागेवर शेतकऱ्यांची नाराजी ओढवून कारशेडचे दुसरे आरक्षण कशासाठी असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच गायमुख येथील वाडिया यांच्या जागेवरील महापालिकेचे आरक्षण हटवणार असल्याने ठामपाचे मोठे नुकसान होणार असून वाडिया यांचा फायदा होणार आहे.
अन्यथा उपोषण करणार
वाडिया यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी गायमुख येथे कारशेडचे आरक्षण टाकणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी, अन्यथा शेतकऱ्यांच्या हितासाठी आपल्याला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशाराही त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात दिला आहे.