काय सांगता?, तब्बल 1 कोटी ६७ लाख रुपयांच्या अवैध खतांचा साठा जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 09:50 PM2022-03-03T21:50:10+5:302022-03-03T21:50:50+5:30
पराग जोशी व अरविंद शंकर पटेल (वय २५) असे खताची व कीटकनाशकांच्या साठेची अवैधपणे साठवणूक केलेल्या आरोपींची नावे आहेत
भिवंडी : एक कोटी ६७ लाख ८९ हजार ९७५ रुपये किंमतीच्या खतासह दोन लाख २६ हजार ६५० रुपये किंमतीचा कीटकनाशकांचा अवैध साठा नारपोली पोलिसांनी बुधवारी जप्त केला केला आहे. याप्रकरणी ऍग्रो फार्म कंपनीच्या मालकासह गोडाऊन भाड्याने देणाऱ्या इसमासह दोघांविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पराग जोशी व अरविंद शंकर पटेल (वय २५) असे खताची व कीटकनाशकांच्या साठेची अवैधपणे साठवणूक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी पराग जोशी यांनी मेसर्स बी जोशी ॲग्रो केम फार्मा या कंपनीचे नावाने खंडागळे ईस्टेट पूर्णा येथील विद्या लॉजिस्टिक वेअर हाऊस मध्ये शासनाचा कोणताही परवाना न घेता स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी एक कोटी ६७ लाख ८९ हजार ९७५ रुपये किंमतीच्या खताचा अवैद्य साठा करून ठेवला होता. त्याचबरोबर दोन लाख २६ हजार ६५० रुपये किमतीचे कीटकनाशकांचा साठादेखील अनधिकृतपणे करून ठेवला होता.
दरम्यान, याप्रकरणी नारपोली पोलिसांनी ऍग्रो कंपनीच्या पराग जोशी सह गोडाउन भाड्याने देणारे अरविंद पटेल यांच्या विरोधात नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.