लॉकडाऊनने नेमके साधले काय?, विविध शहरांमधील व्यापाऱ्यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 12:05 AM2020-07-13T00:05:56+5:302020-07-13T00:06:33+5:30
सततच्या लॉकडाऊनमुळे व्यापाºयांचे कंबरडे मोडले असून अशीच परिस्थिती राहिल्यास शेतकºयांप्रमाणे व्यापाºयांनाही आत्महत्या करावी लागेल, अशा शब्दांत यूटीए व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुमित चक्रवर्ती यांनी व्यथा मांडली आहे.
- सदानंद नाईक
उल्हासनगर : कोरोनामुळे तीन ते साडेतीन महिन्यांपासून व्यापार ठप्प झाला आहे. व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात अनलॉक १ जाहीर करुन व्यवहार सुरळीत होत नाही तोच रुग्ण वाढत असल्याचे कारण पुढे करत उल्हासनगर पालिका क्षेत्रात २ ते १२ जुलै दरम्यान लॉकडाऊन जाहीर केला आहे. यामुळे रुग्णांच्या संख्येत घट होईल असे प्रशासनाला वाटत होते, मात्र तसे काहीही झाले नाही. उलट या दहा दिवसांत १८०० रुग्णांची वाढ झाली. आता पुन्हा २२ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे.
सततच्या लॉकडाऊनमुळे व्यापाºयांचे कंबरडे मोडले असून अशीच परिस्थिती राहिल्यास शेतकºयांप्रमाणे व्यापाºयांनाही आत्महत्या करावी लागेल, अशा शब्दांत यूटीए व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुमित चक्रवर्ती यांनी व्यथा मांडली आहे. लॉकडाऊन करुन प्रशासनाने काय साधले आहे असा सवालही त्यांनी उपस्थित रेला आहे.
उल्हासनगरमध्ये फर्निचर, जीन्स, जपानी, गजानन, गाऊन, बॅग, इलेक्ट्रॉनिक्स मार्केट आहे. राज्यातून येथे खरेदीसाठी व्यापारी व नागरिक येतात. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी महापालिका आयुक्तांच्या आवाहनाला मान देऊन, व्यापाºयांनी दुकाने बंद केली. प्रत्येकवेळी व्यापाºयांनी नाईलाजाने लॉकडाऊनचे समर्थन केले. अनलॉक १ जाहीर झाल्यावर व्यापाºयांनी नियमांचे पालन करुन व्यवहार सुरु केले. मात्र कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे महापालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी यांनी २ जुलै ते १२ जुलै दरम्यान लॉकडाऊन जाहीर केला. त्यापूर्वी व्यापारी संघटनेने स्वत:हून लॉकडाऊन करा, असे पत्र महापालिकाला दिले होते. शहरात लॉकडाऊन दरम्यान महापालिकेने विविध उपाययोजना करायला हव्या होत्या. मात्र त्या केलेल्या दिसल्या नाहीत. लॉकडाऊनची मुदत वाढवली आहे. हे लोकशाहीत बसत नसल्याचा आरोप त्यांनी केला.
व्यापारी, कामगारांवर आली आहे उपासमारीची वेळ
शहरातील बहुतांश व्यापारी धार्मिक वृत्तीचे असल्याने कामावर असलेल्या बहुतांश कामगारांना गेल्या तीन महिन्यांपासून पगार देत आहेत. मात्र, सततच्या लॉकडाऊनमुळे व्यापाºयांसह कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. या सर्व प्रकाराला महापालिकेचे धोरण कारणीभूत असल्याचे मतही सुमित चक्रवर्ती यांनी व्यक्त केले.