अक्षय शिंदेचा मृत्यू नेमका कशामुळे, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 08:45 AM2024-09-25T08:45:12+5:302024-09-25T08:45:33+5:30

Akshay Shinde Postmortem Report : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीचा २३ सप्टेंबर रोजी पोलीस एन्काऊंटमध्ये मृत्यू झाला. त्याचा मृत्यू कशामुळे झाला, याचे कारण शवविच्छदेन अहवालातून समोर आले आहे.  

What is the exact cause of death of Badlapur sexual assault case accused Akshay Shinde, what is in the postmortem report? | अक्षय शिंदेचा मृत्यू नेमका कशामुळे, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय?

अक्षय शिंदेचा मृत्यू नेमका कशामुळे, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय?

Akshay Shinde Encounter Latest Update : पोलीस एन्काऊंटमध्ये मारल्या गेलेल्या अक्षय शिंदेच्या मृत्यूचे नेमके कारण समोर आले आहे. अक्षय शिंदेचा शवविच्छेदन (Akshay Shinde Postmortem Report) समोर आला असून, त्यातून पोलिसांनी झाडलेली गोळी अक्षय शिंदे कुठे लागली, हेही समोर आले आहे. (what is in Akshay Shinde Postmortem Report)

अक्षय शिंदेला तळोजा कारागृहातून बदलापूर नेण्यात येत होते. मुंब्रा येथे झालेल्या पोलीस एन्काऊंटरमध्ये त्याचा मृत्यू झाला. अक्षय शिंदेला कुठे गोळी लागली होती, याबद्दल पोलिसांनी कोणतीही माहिती दिली नव्हती. ती पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आली आहे.  

अक्षय शिंदेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय शिंदेच्या डोक्यात गोळी मारण्यात आली होती. अति रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला. अक्षय शिंदेचा पोस्टमार्टेम रिपोर्ट मुंब्रा पोलिसांना सुपूर्द करण्यात आला आहे. 

अक्षय शिंदेच्या मृतदेहाचे शवविच्छेदन मंगळवारी (२४ सप्टेंबर) करण्यात आले. तब्बल सात तास हे शवविच्छेदन सुरू होते. इन कॅमेरा ते करण्यात आले असून, त्यात पाच डॉक्टरांचा समावेश होता. 

अक्षय शिंदेचे शवविच्छेदन झाल्यानंतर ठाणे पोलीस रुग्णालयातून बाहेर पडले होते. महत्त्वाची बाब म्हणजे अक्षय शिंदेचा मृतदेह कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आलेला नाही. त्याचा मृतदेह कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाती शवगरात ठेवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

मानवी हक्क आयोगाच्या नियमावलीनुसार झाले अक्षय शिंदेचे पोस्टमार्टेम

जेजे रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले की, राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या नियमावलीनुसार पोस्टमार्टेम करण्यात आले. अक्षय शिंदेचा गोळी लागल्यानंतर कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेण्यात आले होते. डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर त्याचा मृतदेह जे.जे. रुग्णालयात पोस्टमार्टेमसाठी नेण्यात आला होता. 

Web Title: What is the exact cause of death of Badlapur sexual assault case accused Akshay Shinde, what is in the postmortem report?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.