कल्याणमधील तलावांचे वावडे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 02:10 AM2018-03-30T02:10:13+5:302018-03-30T02:10:13+5:30

केडीएमसीच्या अर्थसंकल्पात डोंबिवलीतील एमआयडीसीतील गणपती विसर्जन तलावाच्या सुशोभीकरणासाठी २५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे

What is the welfare of ponds in Kalyan? | कल्याणमधील तलावांचे वावडे का?

कल्याणमधील तलावांचे वावडे का?

Next

कल्याण : केडीएमसीच्या अर्थसंकल्पात डोंबिवलीतील एमआयडीसीतील गणपती विसर्जन तलावाच्या सुशोभीकरणासाठी २५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, तलावांचे शहर असलेल्या कल्याणमधील निम्याहून अधिक तलावांना कचरा कुंडीचे स्वरूप आले आहे. या तलावांच्या सुशोभीकरणाकडे महापालिका प्रशासनाने कानाडोळा केल्याचे स्पष्ट होत आहे. अर्थसंकल्प हा सर्वसमावेशक असल्याचा दावा केला जात असताना दुसरीकडे फक्त डोंबिवलीतील एका तलावासाठी एवढ्या निधीची तरतूद का?, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
ठाणे जिल्हा हा तलावांचा जिल्हा. ठाण्यापाठोपाठ कल्याणला ही तलावांचे शहर संबोधले जाते. परंतु, कल्याणमधील अनेक तलाव सध्या कचऱ्याने भरलेले आहेत. पश्चिमेतील आधारवाडी तलाव असो अथवा पूर्वेतील वालधुनी पुलाशेजारील विठ्ठलवाडी तलाव ही त्याची ताजी उदाहरणे आहेत. या तलावांमध्ये कचºयाच्या प्लास्टिक पिशव्या भिरकावल्या जात असल्याने या तलावांचे डम्पिंगमध्ये रूपांतर झाले आहे. मात्र, त्याकडे केडीएमसीचे दुर्लक्ष झाले आहे. तलावांच्या विकासाकडे अर्थसंकल्पातही कानाडोळा करण्यात आला आहे. परंतु, डोंबिवली एमआयडीसीतील तलावाच्या सुशोभिकरणासाठी २५ लाखांची तरतूद केल्याने कल्याणमधील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. एमआयडीसी तलावाचे सुशोभीकरण करताने तेथे आबालवृद्धांना करमणुकीची साधने उपलब्ध करून दिली जाणार आहेत. हे योग्य असलेतरी कल्याणमधील अस्तित्व संपुष्टात आलेल्या तलावांना सापत्न वागणूक का?, असाही सवाल उपस्थित केला जात आहे.
नांदिवली तलाव, चिंचपाडा तलाव, हनुमाननगर तलाव यांची अवस्थाही दयनीय झाली आहे. या तलावांकडे वेळीच लक्ष न दिल्यास कल्याण हे तलावांचे शहर ही ओळख संपुष्टात येण्यास वेळ लागणार नाही, अशीही भावना नागरिकांनी व्यक्त केली. गणेशोत्सवाच्या वेळी या तलावांची साफसफाई केली जाते, पण उत्सव सरताच याचा वापर केवळ कचरा, निर्माल्य टाकण्यासाठीच होतो. विठ्ठलवाडी तलावाला कचºयामुळे गटाराचे स्वरूप आल्याने तेथे यंदाच्या गणेशोत्सवात गणपती विसर्जनास बंदी घालण्यात आली होती.
स्मार्ट सिटी योजनेतून केवळ कल्याणच्या विकासाला प्राधान्य दिले गेले आहे. त्यामुळे अर्थसंकल्पात डोंबिवलीत विकासकामे करण्यावर भर देण्यात आला आहे. असे असले तरी स्मार्ट सिटीच्या कामांना सुरुवातही झालेली नाही. त्यातच अर्थसंकल्प हा सर्वसमावेशक असताना हा दुजाभाव का?, असाही सवाल केला जात आहे.

तरतुदीची अंमलबजावणी व्हावी
एमआयडीसीतील तलावाच्या सुशोभीकरणासाठी तरतूद केली गेली असलीतरी त्याची अंमलबजावणीही झाली पाहिजे. सध्या या तलावाकडे केडीएमसीचे पुरते दुर्लक्ष झाले आहे. महापालिकेने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, अन्यथा हा तलावही नामशेष होण्यास विलंब लागणार नाही, असे डोंबिवली वेलफेअर असोसिएशनचे सचिव राजू नलावडे म्हणाले. कल्याणला नेहमीच सापत्न वागणूक
स्थायी समितीचे सभापतीपद आजवर बहुतांश वेळा डोंबिवलीला मिळाले आहे. त्यामुळे कल्याणला नेहमीच सापत्न वागणूक मिळाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी डोंबिवली शहराला घाणेरडे शहर, अशी उपमा दिल्याने कदाचित यंदा केविलवाणा प्रयत्न झाला असेल. कल्याण शहरातील तलावांची निगा योग्य प्रकारे न राखल्याने अनेक तलाव बुजून गेले. त्यामुळे जे तलाव अस्तित्वात आहेत, त्यांच्या संवर्धनासाठी तरतूद ठेवणे आवश्यक होती. पण तसे झालेले नाही, असे केडीएमसीचे माजी विरोधीपक्षनेते व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे म्हणाले.

Web Title: What is the welfare of ponds in Kalyan?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.