कल्याण-मुरुड एसटीच्या चाकाचे नटबोल्ट भर रस्त्यात गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:47 AM2021-02-17T04:47:30+5:302021-02-17T04:47:30+5:30
कल्याण : भर रस्त्यात चालणाऱ्या एसटीमधून आवाज आल्याने बस थांबवून पाहिले, असता तिच्या एका चाकाचे नटबोल्ट नव्हते. हा प्रकार ...
कल्याण : भर रस्त्यात चालणाऱ्या एसटीमधून आवाज आल्याने बस थांबवून पाहिले, असता तिच्या एका चाकाचे नटबोल्ट नव्हते. हा प्रकार वेळीच माहिती पडल्याने मोठा अपघात टळला. यावरून देखभाल दुरुस्ती योग्य प्रकारे न करताच बसे रस्त्यावर चालविल्या जातात, ही बाब समोर आली आहे.
कल्याण शीळ रस्त्यावर जाणारी बस थांबली असता जागरूक नागरिक योगेश दळवी यांची नजर पडली. त्यांनी चालक-वाहकाकडे विचारणा केली. बसच्या एका चाकाचे नटबोल्ट गायब होते. हा प्रकार लक्षात येताच प्रवाशांना खाली उतरवून दुरुस्तीसाठी कल्याण डेपोशी संपर्क साधण्यात आला. दळवी यांनी बसचा व्हिडीओ काढला आहे. तिच्या चाकाचे नटबोल्ट गायब कसे काय झाले. बस डेपोतून संचलनासाठी बाहेर काढताना चाचणी केली गेली नव्हती का? असा सवाल त्यांनी केला आहे.
यासंदर्भात बस डेपो प्रशासनाकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, ही बस पनवेल डेपोची आहे. कल्याण-मुरुड मार्गावर ती चालते. सध्या ती बस कल्याण डेपोत आणली असून तिच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे.
........
फाेटाे-कल्याण-बस
-------------------