ग्राहकांची लूट करणाऱ्या पेट्रोलपंपावर कारवाई कधी?
By admin | Published: December 12, 2015 12:58 AM2015-12-12T00:58:02+5:302015-12-12T00:58:02+5:30
भारत पेट्रोलियम कंपनीच्या सिटी पारेख खाणपाडा पालघर येथील पेट्रोल पंपावर जास्त पैसे घेऊन कमी पेट्रोल दिले जाते. हे उघडकीस आल्यानंतर पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात पंपावर कारवाईची मागणी करून
मनोर : भारत पेट्रोलियम कंपनीच्या सिटी पारेख खाणपाडा पालघर येथील पेट्रोल पंपावर जास्त पैसे घेऊन कमी पेट्रोल दिले जाते. हे उघडकीस आल्यानंतर पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात पंपावर कारवाईची मागणी करून सुद्धा ती करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे हा पंप सुरु असल्याने या प्रकरणी भ्रष्ट्राचार तर झाला नसेल अशी चर्चा आहे.
३ सप्टेंबरला भारत पेट्रोलीयम कंपनीच्या सीटी पारीख पेट्रोल पंपावर दोन मोटरसायकलमध्ये ९०० रू. चे पेट्रोल १३.७८ पॉर्इंट पेट्रोल टाकल्याचे बिल दिले मात्र दोन्ही मोटरसायकलच्या टाकीमधून पेट्रोल काढले असता पाच पाच लिटरचे मोजमापामध्ये फक्त ८ लिटर पेट्रोल निघाले. १३.७८ पॉर्इंट पेट्रोल मध्ये ५.७८ लिटर पेट्रोल कमी दिले हे लोकमत वार्ताहर आरीफ पटेल यांनी उघडकीस केले. त्यावेळी पुरवठा अधिकारी पावरा, तहसिलदार चंद्रसेन पवार, मोजमाप अधिकारी सुरवसे, भारत पेट्रोलियम कंपनीचे अधिकारी जावीद देसाई इतर कर्मचारी शेकडो ग्राहक यांचे समक्ष पाच लिटरचे दोन्ळी मोजमाप मध्ये फक्त चार चार एकूण आठ लिटर पेट्रोल निघाल्याचे पंचनामेही केले खात्री केली तसेच भारत पेट्रोलियम कंपनीचे अधिकारी जाविद देसाई यांनी सीटी पारिख पेट्रोल पंपाचे कॅबीनमध्ये असलेल्या कम्युटर तपासणी केली असता ४०० रू. पेट्रोल टाकल्याची नोंद आॅनलाईन डाटा मध्ये दिसली मात्र त्याच्यामागे दुसरी मोटरसायकल मध्ये रू. ५०० पेट्रोल टाकल्याची नोंद संगणकामध्ये दिसून आली नाही असे देसाई यांनी शासकीय अधिकारी व तक्रारदार ग्राहक यांच्यासमोर सांगितले.
जिल्हाधिकारी पालघर यांच्याकडे पंपावर कारवाई करण्याबाबत अर्ज केला आहे. त्यानंतर दोन वेळा आरीफ पटेल व इतर लोकांनी जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांची प्रत्यक्ष भेट घेतली. त्यांना ग्राहकांची लुट कशी केली जाते याबाबत सविस्तर सांगीतले. त्यावेळी त्यांनी पंपावर कारवाई करण्यासाठी मी संबंधीत अधिकाऱ्याला बोलतो असे सांगितले. परंतु दोन महिने उलटले तरी सुद्धा कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. (वार्ताहर)