ठाण्याच्या मेट्रोचा नारळ केव्हा फुटणार!

By admin | Published: June 8, 2015 03:54 AM2015-06-08T03:54:57+5:302015-06-08T03:54:57+5:30

मुंबईतील मेट्रो रुळांवर आल्यानंतरही ठाण्यातील मेट्रो रेल्वे अडथळ्यांच्या शर्यतीत अडकली होती. मात्र, त्यातूनही मार्ग काढून वडाळा-घोडबंदर (कासारवडवली) मेट्रोला अखेर गेल्या वर्षी मंजुरी मिळाली.

When the coconut of Thane met! | ठाण्याच्या मेट्रोचा नारळ केव्हा फुटणार!

ठाण्याच्या मेट्रोचा नारळ केव्हा फुटणार!

Next

अजित मांडके/ पंकज रोडेकर, ठाणे
मुंबईतील मेट्रो रुळांवर आल्यानंतरही ठाण्यातील मेट्रो रेल्वे अडथळ्यांच्या शर्यतीत अडकली होती. मात्र, त्यातूनही मार्ग काढून वडाळा-घोडबंदर (कासारवडवली) मेट्रोला अखेर गेल्या वर्षी मंजुरी मिळाली. मात्र, ठाणे मेट्रोच्या भूमिपूजनाला अद्यापही मुहूर्त लागत नसल्याचे दिसत आहे. दुसरीकडे इतर शहरांमध्ये मेट्रोच्या प्रकल्पाला वेग येत असताना ठाण्यावरच अन्याय का, असा सवालही उपस्थित होत आहे.
कासारवडवली येथे मेट्रोच्या कारशेडसाठी सुरू केलेल्या सर्वेक्षणाला शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला होता. याच दरम्यान, या प्रकल्पामुळे जमिनींच्या किमतींमध्ये वाढच होणार असल्याने शेतकऱ्यांना दुप्पट फायदा तसेच भूमिपुत्रांना रोजगारही मिळणार आहे. या कारशेडसाठीही शेतकऱ्यांची समजूत काढण्यात पालिका प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना यश आले आहे. त्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यात येणार असल्याने या शेतकऱ्यांनी कारशेडसाठी आपल्या जमिनी देण्यास हिरवा कंदील दर्शविल्यावर मेट्रोच्या कारशेडच्या ४० हेक्टर जागेचा सर्व्हे पूर्ण झाला. त्यानंतर, आता तांत्रिक डिझाइन तयार करण्याचे काम एमएमआरडीएच्या माध्यमातून सुरू झाले होते. डिझाइनचे काम पूर्ण झाल्यावर पुढील प्रक्रिया हाती घेण्यात येणार आहे.
वडाळा ते घोडबंदर-कासारवडवली या महत्त्वाकांक्षी मेट्रोच्या या मार्गासाठी १९ हजार कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला असून ३२ किमीच्या या मार्गामध्ये ३० स्थानके असणार आहेत. त्यातील २४ स्थानके भुयारी असणार आहेत. सहा स्थानके ही वरील बाजूस असणार आहेत, तर ठाण्यात एकूण १३ स्थानके असणार आहेत. ही सर्व स्थानके भुयारीच असणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

च्तीनहात नाका ते ओवळा कारशेडपर्यंत १३ स्थानके प्रस्तावित आहेत. यामध्ये तीनहात नाका, आरटीओ, वागळे, कॅडबरी, गोल्डन डाइज, कापूरबावडी, मानपाडा, पातलीपाडा, टिकुजिनीवाडी, आनंदनगर, वाघबीळ, कासारवडवली आणि ओवळा (कारशेड) अशी स्थानके आहेत. कारशेडच्या मुद्द्यावर श्रेय घेण्यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये जुंपली
होती. त्या वेळी आरोप-प्रत्यारोपांचे राजकीय युद्ध रंगल्याने मेट्रोचे कारशेडच आता कारशेडला लागण्याची चिन्हे निर्माण झाली होती.

च्ठाण्याच्या भविष्याच्या दृष्टीने अत्यावश्यक असलेल्या या प्रकल्पाबाबत आपण त्वरित निर्णय घेऊन एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना या प्रकल्पाच्या कामास सुरुवात करण्याचे निर्देश द्यावेत व आपल्या हस्ते होणाऱ्या या प्रकल्पाच्या भूमिपूजनाची तारीखही निश्चित करावी, अशी मागणी ठाणेकरांकडून होत आहे. कारशेडसाठी ओवळा-भाईंदरपाडा येथील शॅलो वॉटर पार्ककरिता आरक्षित असलेल्या ६०० एकर जागेवर बाधितांना स्थलांतरित केले जाईल. कासारवडवलीतील २० ते २५ शेतकरी बाधित होणार आहेत.

Web Title: When the coconut of Thane met!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.