सौर उर्जेवर पाणी तापणार कधी?

By admin | Published: December 12, 2015 01:38 AM2015-12-12T01:38:00+5:302015-12-12T01:38:00+5:30

इंधन व वीज बचतीसाठी निवासी इमारती तसेच अन्य इमारतींमध्ये सौरऊर्जा यंत्रणा बसवणे बंधनकारक केलेले असले तरी अशी यंत्रणा कार्यान्वित नसताना महापालिका

When does the solar water heat water? | सौर उर्जेवर पाणी तापणार कधी?

सौर उर्जेवर पाणी तापणार कधी?

Next

मीरा रोड : इंधन व वीज बचतीसाठी निवासी इमारती तसेच अन्य इमारतींमध्ये सौरऊर्जा यंत्रणा बसवणे बंधनकारक केलेले असले तरी अशी यंत्रणा कार्यान्वित नसताना महापालिका मात्र सर्रास सौरऊर्जा यंत्रणा कार्यान्वित असल्याचे नाहरकत दाखले देत आहे . अशा खोट्या नाहरकत दाखल्यावर अधिकाऱ्यांचे खिसे मात्र गरम होत आहेत . सौरऊर्जेचा वापरच होत नसल्याने इंधन व वीज बचतीचा शासनाचा हेतू सपशेल अपयशी ठरला आहे.
मीरा भार्इंदर नगरपालिका असल्यापासून विकास नियंत्रण नियमावलीमध्ये रु ग्णालय , शाळा, महाविद्यालय , हॉस्टेल , हॉटेल, प्रयोगशाळा, कॅन्टीन आदीच्या इमारतीं मध्ये सौर ऊर्जेवर पाणी गरम करण्याची यंत्रणा बसवणे बंधनकारक करण्यात आले कालांतराने शासनाने सर्वच इमारतींना सौर ऊर्जेवर पाणी गरम करण्याची यंत्रणा बंधनकारक केल्याने मीरा भार्इंदर महापालिकेने देखील २००७ पासून बांधकाम परवानगी देताना सौर ऊर्जा यंत्रणा बसवण्याची अट टाकली . निवासी इमारतीत प्रत्येक सदनिकेस दररोज १००लिटर गरम पाणी मिळेल अश्या क्षमतेची सौर ऊर्जा यंत्रणा बसवणे विकासकास बंधनकारक केले. भोगवटा दाखला घेण्याआधी पालिकेच्या बांधकाम विभागा कडून सौर उर्जा यंत्रणा कार्यान्वित असल्याचे नाहरकत प्रमाणपत्र दिले जाते .
सौरऊर्जा यंत्रणा कार्यान्वित असल्याच्या दाखल्यांवर २००८-०९ पासून भोगवटा दाखले देण्यास सुरुवात झाली. तेव्हा पासून २०१५पर्यंत बांधकाम विभागाच्या नाहरकत दाखल्यावर तब्बल ४५०भोगवटा दाखले नगररचना विभागाने दिले आहेत . परंतु बहुतांशी इमारतींमध्ये सौर ऊर्जा यंत्रणा कार्यान्वितच नसल्याची धक्कादायक माहिती आहे . निवासी इमारतीवर प्रती सदनिका १०० लिटर प्रमाणे त्या क्षमते नुसार सौर ऊर्जा यंत्रणा गच्चीवर उभारणे आवश्यक आहे . परंतु प्रत्यक्षात खानापूर्ती केली जाते . शिवाय प्रत्येक सदनिकेस गरम पाण्यासाठी स्वतंत्र जोडणी देणे आवश्यक असताना अश्या जोडण्याच दिल्या जात नाहीत . निवासी इमारत व अन्य इमारती मध्ये प्रत्यक्षात सौर ऊर्जेचे पाणी येते का ? क्षमतेनुसार यंत्रणा उभारली आहे का ? या महत्वाच्या बाबी तपासल्याच जात नाहीत . सौर ऊर्जेची यंत्रणाच कार्यान्वित नसल्याने सदनिका धारकांना खर्चिक गिझर वा इंधनाचा वापर करावा लागतो .

Web Title: When does the solar water heat water?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.