उल्हासनगरात एमएमआरडीएच्या ७ रस्त्याच्या कामाला मुहूर्त कधी? आयुक्तांनी घेतली बैठक

By सदानंद नाईक | Published: July 28, 2023 05:42 PM2023-07-28T17:42:41+5:302023-07-28T17:45:29+5:30

महापालिका स्थायी समिती सभागृहात त्यांनी एमएमआरडीए अधिकाऱ्या सोबत संयुक्त बैठक घेऊन चर्चा केली आहे.

When is MMRDA's 7 road work due in Ulhasnagar Commissioner held a meeting | उल्हासनगरात एमएमआरडीएच्या ७ रस्त्याच्या कामाला मुहूर्त कधी? आयुक्तांनी घेतली बैठक

उल्हासनगरात एमएमआरडीएच्या ७ रस्त्याच्या कामाला मुहूर्त कधी? आयुक्तांनी घेतली बैठक

googlenewsNext

उल्हासनगर : शहरातील मुख्य एकून ७ रस्त्यासाठी एमएमआरडीएने १५० कोटीचा निधी मंजूर केला. मात्र रस्त्याच्या कामाला मुहूर्त लागत नसल्याने, रस्ते मुदतीत पूर्ण करण्यासाठी आयुक्त अजीज शेख हे अकॅशन मूड मध्ये आले. महापालिका स्थायी समिती सभागृहात त्यांनी एमएमआरडीए अधिकाऱ्या सोबत संयुक्त बैठक घेऊन चर्चा केली आहे.

 उल्हासनगरातील नेताजी चौक मार्गे कुर्ला कॅम्प ते कैलास कॉलनी, न्यू इंग्लीश हायस्कुल ते लालचक्की चौक, शांतीनगर डॉल्फीन क्लब मार्गे सेंच्युरी ग्राउंड ते गुरुव्दारा, वाकी कंपाउंड रस्ता, सोनार चौक रस्ता, हिराघाट टेंपल ते डबी हॉटेल व्हाया समर्पन अपार्टमेंट रस्ता, हिराघाट येथील शामाप्रसाद मुखर्जी चौक ते शांतीनगर व्हाया विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन रस्ता असे एकून ७ रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्याला एमएमआरडीएने गेल्या सहा महिन्यांपूर्वी १५० कोटीच्या निधीला मंजुरी दिली. मात्र अद्यापही रस्त्याच्या कामाला मुहूर्त लागला नसून रस्ते मुदतीत होण्यासाठी आयुक्त अजीज शेख हे अकॅशन मूड मध्ये आले आहेत. त्यांनी गुरवारी महापालिका स्थायी समिती सभागृहात अधिकाऱ्यांची रस्त्या बाबत संयुक्त बैठक घेतली आहे.

 शहरातील या मुख्य ७ रस्त्यांची कामे महत्वाकांक्षी असून सदर रस्त्यांच्या कामांकरीता मंजूर झालेल्या निधीचे विहीत मुदतीत विनियोग होणे आवश्यक आहे. याकरीता महापालिका अधिकाऱ्यांनी वेळोवेळी एमएमआरडीए अधिकाऱ्या सोबत वेळावेळी समन्वय साधून विकास कामे लवकरात लवकर पूर्ण होणे बाबत पाठपुरावा केला. सध्या सणोत्सव जवळ येत आहे, तसेच शहरात चालिया हा उत्सव सुरु आहे. नागरिक व वाहतुकीच्या सोईकरीता रस्त्यांवरील खड्डे बुजवून रस्ते सुस्थितीत ठेवणेबाबत एमएमआरडीएचे अधीक्षक अभियंता अर्जुन कोरेगावर, महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ. करुणा जुईकर, जमीर लेंगरेकर, शहर अभियंता संदिप जाधव, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता परमेश्वर बुडगे, एमएमआरडीएचे अमोल जाधव तसेच संबंधित सल्लागार व ठेकेदार यांच्यात बैठक झाली. यावेळी आयुक्त अजीज शेख यांनी मंजूर रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना बजावले आहे.

मंजूर रस्त्याच्या दूरस्तीवर लाखोंचा खर्च
 एमएमआरडीएने शहरातील एकून ७ रस्त्यासाठी १५० कोटीच्या निधीला मजुरी दिली. मात्र वेळेत रस्त्याचे काम सुरू न झाल्याने, महापालिकेला रस्त्याची दुरुस्ती करण्याची वेळ आली आहे. यातूनच आयुक्तांनी बैठक घेऊन रस्त्याचे काम सुरू करण्याचे आदेश दिले आहे.
 

Web Title: When is MMRDA's 7 road work due in Ulhasnagar Commissioner held a meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.