Eknath Shinde: इमारत पूर्ण झाल्यावर नारळ फोडायला बोलवू; एकनाथ शिंदे यांची राष्ट्रवादीवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 09:08 PM2022-02-08T21:08:26+5:302022-02-08T21:08:37+5:30
ठाण्यातील लोकमान्य नगर येथील कोरस रस्त्यालगतच्या सुविधा भूखंडावर शहरातील समूह विकास योजनेंतर्गत पुनर्वसन इमारत उभारण्यात येणार असून या बांधकामाचे भूमीपुजन पालकमंत्नी एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : काहीजण सध्या क्लस्टर योजनेचे गाजर असे फलक लावून टीका करीत आहेत. मात्र त्यांना आता कामाच्या माध्यमातून उत्तर द्यायची वेळ आली आहे. त्यामुळे त्यांना इमारत पूर्ण झाल्यावर नारळ फोडण्यास बोलवू असा टोला ठाणो जिल्हयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीला लगावला आहे. त्यातही नगरसेवक आणि आमदार नाहीत, तिथे उदार मनाने निधी दिला. विकासात कधीही राजकारण केले नाही. त्यामुळे वेळ येईल तेव्हा यावर परखडपणो बोलेन, असे सुतोवाचही त्यांनी केले.
ठाण्यातील लोकमान्य नगर येथील कोरस रस्त्यालगतच्या सुविधा भूखंडावर शहरातील समूह विकास योजनेंतर्गत पुनर्वसन इमारत उभारण्यात येणार असून या बांधकामाचे भूमीपुजन पालकमंत्नी एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. या कार्यक्र मात ते बोलत होते. क्लस्टर राज्यातील नव्हे तर देशातील मोठी योजना ठरणार आहे. या योजनेत नागरिकांना घरासोबतच उदयान आणि इतर सोयीसुविधा मिळणार आहेत. क्लस्टरसाठी सभागृहात आणि रस्त्यावर लढा दिला. आमदारकी गेली तरी बेहत्तर, पण क्लस्टर मंजूर करा अशी भूमिका घेतली. त्यामुळे योजना मंजूर केली. त्यातील काही त्नुटी नगरविकासमंत्नी झाल्यानंतर दूर केल्या, असे त्यांनी सांगितले. क्लस्टर म्हणजे सोपे नव्हते, अनेक अडचणींवर मात करत क्लस्टरच्या इतका टप्पा पार केला आहे. सिडकोकडे नवीन अत्याधुनिक तंत्नज्ञान असून त्यातून ते उत्तम दर्जाचे घर बांधतात. त्यामुळे पालिका जेवढ्या लवकर मोकळे भूखंड करून देईल त्याठिकाणी क्लस्टर योजनेतील इमारत बांधण्याचे काम करणो शक्य होईल, असेही ते म्हणाले. क्लस्टर योजना हा माझा जिव्हाळ्याचा विषय आहे.
योजनेत नागरिकांना हक्काचे घर देईन, तेव्हाच मला आनंद मिळेल, एमएमआरडीए क्षेत्नात लाखो लोक अनधिकृत इमारतीत राहतात, त्यांना या योजनेतून दिलासा देता येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. दिवा भागाचा या योजनेत समावेश करण्याची सूचना त्यांनी पालिकेला केली. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मोठे प्रकल्प हाती घेतले असून शहरासाठी काळू धरणाच्या कामाला सुरु वात केली आहे, असेही ते म्हणाले. खड्डे नसलेले रस्ते, शुद्ध पाणी आणि इतर मूलभूत सुविधा देण्यासाठी प्रयत्न करा असे आदेश त्यांनी पालिका प्रशासनाला दिले.
महापालिका आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांनी सांगितले, या इमारतीत तीनशे चौरस फुटाच्या एकूण २४३ सदनिका असणार आहेत. ही इमारत लवकरच बांधून त्यात किसननगर भागातील नागरिकांना स्थलांतरित करण्यात येणार असून त्यानंतर किसननगर भागात सिडकोच्या माध्यमातून क्लस्टर योजना राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादीवर टीका
क्लस्टर योजनेचे गाजर असे फलक राष्ट्रवादीच्या पदाधिका:यांनी पालिका मुख्यालयासमोर लावले होते. त्याचा समाचार महापौर नरेश म्हस्के यांनी घेतला. समाजात लायकी नाही, सोसायटीचा अध्यक्ष होऊ शकत नाही, असे लोक बॅनर लावून टीका करतात. त्यांच्या आम्ही टीकेला भीक घालतं नाही, अशी टीका त्यांनी भाषणात केली. शिंदे यांना आपला मतदार संघ सोडून निवडून येईल अशा सोयीच्या संघात निवडणूक लढावी लागली नाही, असा टोला त्यांनी गृहनिर्माण मंत्नी जितेंद्र आव्हाड यांना नाव न घेता लगावला.
दरम्यान यावेळी सांयकाळी एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महापालिका मुख्यालयाच्या परिसरात नव्याने बांधण्यात आलेल्या छत्रपती शिवराज्यभिषेक भित्तीशिल्पाचे उदघाटनही करण्यात आले.