त्या ५५ वर्षावरील कर्मचाऱ्यांना पालिका केव्हा देणार भरपगारी सुटटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2020 03:49 PM2020-05-02T15:49:23+5:302020-05-02T15:49:43+5:30

ठाणे महापालिकेच्या विविध सेवेत कार्यरत असलेल्या ५५ वर्षावरील कर्मचाºयांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भर पगारी सुटटी देण्याची मागणी केली जात आहे. मात्र पालिका प्रशासनाकडून या संदर्भात अद्यापही कोणत्याही स्वरुपाचे ठोस पाऊल उचलण्यात आलेले नाही.

When will the corporation give paid leave to the employees above 55 years of age? | त्या ५५ वर्षावरील कर्मचाऱ्यांना पालिका केव्हा देणार भरपगारी सुटटी

त्या ५५ वर्षावरील कर्मचाऱ्यांना पालिका केव्हा देणार भरपगारी सुटटी

Next

ठाणे : मुंबईत ५५ वर्षावरील पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यु झाल्यानंतर ५५ वर्षावरील पोलिसांना सुटटी देण्यात आली आहे. तशीच मागणी आता ठाणे महापालिकेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबततही होऊ लागली आहे. अगदी सेवानिवृत्तीला आलेल्या कर्मचाºयांसह, मधुमेह, ह्रदय विकार, दमा आणि इतर आजार असलेल्या कर्मचाºयांना देखील कोरोनाच्या ड्युटया लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्यांनाही भरपगारी सुटटी देण्यात यावी अशी मागणी म्युनिसिपल लेबर युनियनचे अध्यक्ष रवीराव यांनी आयुक्त विजय सिंघल यांच्याकडे केली आहे.
            ठाणे महापालिका हद्दीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून कोरोनाबाधित रु ग्णांची संख्या ३५० च्या घरात गेली आहे. कोरोनाची लागण होण्यामध्येही ४० ते ६० वर्ष वयोगटातील नागरीकांचा अधिक समावेश आहे. तर मृत पावलेल्यांमध्येही ५५ वर्षावरील नागरीकांचा अधिक समावेश आहे. दुसरीकडे मुंबईत ५५ वर्षावरील वयोगटातील पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यु झाल्यानंतर ५५ वर्षावरील पोलिसांना सुट्या देण्यात आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेतील अशा कर्मचाºयांनाही सुटया देण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच महापालिका कर्मचारी कोरोनाविरुध्दच्या लढाईत नागरिकांच्या आरोग्य रक्षणासाठी झटत आहेत. अशा स्थितीत कर्मचाºयांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून म्युनिसिपल लेबर युनियनचे अध्यक्ष रवीराव यांनी आयुक्त विजय सिंघल यांना पत्र पाठवून काही मागणी केल्या आहेत. त्यामध्ये जे कर्मचारी ५५ वर्षावरील आहेत व त्यांना मधुमेह, ह्रदय विकार, दमा व इतर आजार आहेत, अशा कर्मचाºयांना भरपगारी सुट्टी देण्यात यावी. तसेच ५५ वर्षावरील इतर कर्मचाºयांना कोरोनाशी संबंधित कामकाज न देता त्यांना इतर काम देण्यात यावे, अशाप्रकारची मागणी करण्यात आली आहे. तसेच याबाबत तातडीने निर्णय घेण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
 

 

Web Title: When will the corporation give paid leave to the employees above 55 years of age?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.