ठाण्यात तरुणांचे लसीकरण कधी होणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:26 AM2021-07-11T04:26:49+5:302021-07-11T04:26:49+5:30
- चिन्मय महाकाळ, ठाणे ------------ मागील आठवड्यात लस घेण्यासाठी गेले होते. मात्र, तेथे लागलेल्या रांगा पाहून भीती वाटली. ...
- चिन्मय महाकाळ, ठाणे
------------
मागील आठवड्यात लस घेण्यासाठी गेले होते. मात्र, तेथे लागलेल्या रांगा पाहून भीती वाटली. या रांगेत उभे राहिले तर आपण कोरोनाला तर निमंत्रण देत नाही ना? अशी भीती वाटत होती. लस नसल्याने केंद्रावर झुंबड उडत आहे; परंतु लस मिळावी, अशी आमची इच्छा आहे. सरकारने लवकरात लवकर लस उपलब्ध करून देऊन आमचा कोरोनापासून बचाव करावा.
- स्नेहा सावंत, ठाणे
-------
वारंवार लसींचा तुटवडा जाणवत आहे. खासगी रुग्णालयात मात्र सशुल्क लस उपलब्ध आहे. मोफत लसीसाठी लसीचा तुटवडा आहे. त्यामुळे सशुल्क लस आम्हाला कशी परवडणार? शासनाने मोफत लस देणार म्हणून सांगितले आहे; परंतु तीच उपलब्ध नसल्याने खासगी रुग्णालयातून लस घेण्यासाठी आम्हा सर्वसामान्यांवर सरकार अशा पद्धतीने दबाव आणत नाही ना? अशी शंका मनात निर्माण झाली आहे.
- अशोक सोनावले, ठाणे
----------------