१०० "ची तूरडाळ आहे कुठे?

By Admin | Published: November 7, 2015 01:13 AM2015-11-07T01:13:51+5:302015-11-07T01:13:51+5:30

तूरडाळीचे भाव गगनाला भिडल्यावर तिचे अवैध साठे पकडल्यानंतर तिची प्रतिकिलो १०० रुपयांमध्ये विक्री केली जाणार असल्याचे राज्यातील भाजपाप्रणीत सरकारकडून सांगितले

Where is the 100 "Thuradal? | १०० "ची तूरडाळ आहे कुठे?

१०० "ची तूरडाळ आहे कुठे?

googlenewsNext

ठाणे : तूरडाळीचे भाव गगनाला भिडल्यावर तिचे अवैध साठे पकडल्यानंतर तिची प्रतिकिलो १०० रुपयांमध्ये विक्री केली जाणार असल्याचे राज्यातील भाजपाप्रणीत सरकारकडून सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात ठाणे शहरात २१० रुपये, कल्याण-डोंबिवलीत १९० रुपये, मीरा-भार्इंदरमध्ये १४५ रुपये, भिवंडीत २०० रुपये, उल्हासनगरात २०० रुपये, अंबरनाथ-बदलापूरमध्ये १५० ते १६० रुपये या दराने तूरडाळीची विक्री सुरू असल्याने १०० रुपये प्रतिकिलो दराने डाळ खरेदी हे दिवास्वप्न ठरले आहे.
यापूर्वी कांद्याच्या दराने शंभरी गाठल्याने गोरगरीब व मध्यमवर्गीय मेटाकुटीस आला होता. आता तूरडाळीने उच्चांक गाठला आहे. ऐन दिवाळीत सणासुदीच्या दिवसांत गोरगरिबांना डाळ-भात खाणेही मुश्कील झाले आहे. शिवसेनेने तूरडाळ आमच्यामुळे स्वस्त झाली, असा दावा करीत तिची प्रतिकिलो १२० रुपयांना विक्री केली जाईल, अशी घोषणा करताच शिवसेनेवर कुरघोडी करण्यासाठी भाजपाने १०० रुपये दराने तूरडाळ विक्री करण्याची घोषणा केली.

भाजपाने अजून स्वस्त दरातील तूरडाळ विक्रीचे स्टॉल्स फारसे सुरू केलेले नाहीत. मोजकेच काही स्टॉल्स सुरू झाले असले तरी ठाणे परिसरातील शहरांची व्याप्ती लक्षात घेता तेथपर्यंत पोहोचणे सामान्यांना शक्य नाही. परिणामी, महागडी तूरडाळ खरेदी करताना कुठे आहेत अच्छे दिन, असा सवाल ते करीत आहेत.

Web Title: Where is the 100 "Thuradal?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.