कुठे आहे कोरोना? चिमणी गल्लीतील बाजारपेठ फुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:38 AM2021-04-13T04:38:29+5:302021-04-13T04:38:29+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : दोन दिवसांचा विकेंड लॉकडाऊन संपल्यावर सोमवारनंतर पुन्हा लॉकडाऊन लागू होण्याच्या शक्यतेने चिमणी गल्लीतील बाजारपेठेत ...

Where is Corona? Chimney Street Market is full | कुठे आहे कोरोना? चिमणी गल्लीतील बाजारपेठ फुल्ल

कुठे आहे कोरोना? चिमणी गल्लीतील बाजारपेठ फुल्ल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : दोन दिवसांचा विकेंड लॉकडाऊन संपल्यावर सोमवारनंतर पुन्हा लॉकडाऊन लागू होण्याच्या शक्यतेने चिमणी गल्लीतील बाजारपेठेत तुडुंब गर्दी झाली होती. त्यामुळे रविवारी २४०५ रुग्ण आढळल्याचे गांभीर्य डोंबिवलीकर नागरिकांना नाही का, अशी चर्चा सर्वत्र सुरू होती.

मंगळवारी गुढीपाडवा असल्याने ठिकठिकाणी तोरण, खाद्यपदार्थ घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. फिजिकल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडालेला होता. महापालिका, पोलीस यंत्रणादेखील सुस्त असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे कडक उन्हातही दिवसभर नागरिकांनी खरेदी केली. हीच स्थिती पश्चिमेलादेखील होती. घनश्याम गुप्ते पथ, उमेशनगर तसेच अन्यत्र खरेदीसाठी गर्दी झालेली होती. नागरिकांनी कोविडबद्दलच्या मार्गदर्शक तत्त्वांची पायमल्ली केल्याचे सर्वत्र आढळून आले.

* ठाकुर्ली परिसरातही नागरिकांनी भाजीपाला, धान्य खरेदीसाठी गर्दी केली होती. त्यामुळे तेथेही कोरोनाबद्दलचे भय नसल्याचे दिसून आले.

* दोन दिवस बंद असल्याने त्याचा फटका रिक्षा व्यवसायाला बसला. त्यामुळे सोमवारी रिक्षा व्यवसाय पहाटेपासूनच सुरू झाला. शहरातील ओसाड रस्ते सकाळपासून वाहनांनी भरले होते. सर्वकाही जैसे थे असल्याचे निदर्शनास आले.

* अत्यावश्यक सेवेची दुकाने दोन्ही दिवस सुरू होती. परंतु तरीही ती बंद होतात की काय, या भीतीने नागरिकांनी एकच गर्दी करत तिथेही फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवला.

* लोकल पकडण्यासाठी दोन दिवसांच्या तुलनेत गर्दी होती. प्रथम, द्वितीय श्रेणीच्या डब्यात महिलांना उभे राहून मुंबईला जावे लागले. सकाळच्या वेळेत खूप गर्दी असल्याने लोकल भरभरून धावल्याचे निदर्शनास आले.

--------------

Web Title: Where is Corona? Chimney Street Market is full

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.