तेव्हा कुठे होती सेना,भाजपा?

By admin | Published: October 29, 2015 11:29 PM2015-10-29T23:29:50+5:302015-10-29T23:29:50+5:30

ओवेसीचे मोर्चे आले तेव्हा कुठे होती, शिवसेना-भाजपा. ज्या वेळी मुंबईतील आझाद मैदानात पोलीस भगिनींवर हल्ले झाले, तेव्हा कुठे होते हे.

Where was the army, BJP? | तेव्हा कुठे होती सेना,भाजपा?

तेव्हा कुठे होती सेना,भाजपा?

Next

डोंबिवली : ओवेसीचे मोर्चे आले तेव्हा कुठे होती, शिवसेना-भाजपा. ज्या वेळी मुंबईतील आझाद मैदानात पोलीस भगिनींवर हल्ले झाले, तेव्हा कुठे होते हे. तेव्हाही केवळ मनसेनेच मोर्चा काढला होता, असा हल्ला मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेना-भाजपावर केला.
महापालिका निवडणुकीच्या प्रचारानिमित्त ते डोंबिवलीत फडके रोडवरील सभेत बोलत होते. रा.स्व. संघाबद्दल आम्हालाही नितांत आदर-अभिमान असल्याचे ते म्हणाले. आता त्यांना सावरकर आठवतात. बाबासाहेब पुरंदरेंचा उल्लेख केवळ या ठिकाणी येऊन करायचा, परंतु प्रत्यक्षात जेव्हा त्यांच्यावर हल्ले होत होते, तेव्हा हे कुठे गेले होते? तेव्हा केवळ मनसैनिक त्यांच्यासाठी उभा राहिला होता.पंतप्रधान मोदी तर सदासर्वदा परदेशांतच असतात. तर, पवारांचे राजकारण जातीयवादाला खतपाणी घालणारे आहे.
या वेळी गेल्या साडेतीन वर्षांत नाशिक येथे केलेल्या कामांचा लेखाजोखा त्यांनी मांडला. अरुण जेटली सांगतात, १०० बारामती झाल्या पाहिजेत.
आता बारामती आठवते. परंतु, लोकसभा निवडणुकीत पवार हटवा, असे सांगणारे नरेंद्र मोदी निवडून आल्यावर तेथे जाऊन त्यांचे गुणगाण गातात, हे काय चाललंय काय? असा सवालही त्यांनी केला.
(प्रतिनिधी)

Web Title: Where was the army, BJP?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.