केडीएमसीचे लसीकरण कुठे होणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:42 AM2021-05-08T04:42:46+5:302021-05-08T04:42:46+5:30
कल्याण : कल्याण- डोंबिवली महापालिका हद्दीत उद्या १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी आर्ट गॅलरी येथे लसीकरण केले जाईल. त्याचबरोबर ...
कल्याण : कल्याण- डोंबिवली महापालिका हद्दीत उद्या १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी आर्ट गॅलरी येथे लसीकरण केले जाईल. त्याचबरोबर ४५ वर्षे व त्यावरील वयोगटासाठी डोंबिवली एकता नगरातील समाजमंदिर हॉलमध्ये लसीकरण केले जाणार आहे.
आर्ट गॅलरी येथील लसीकरण केंद्रावर १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनी ऑनलाइन स्लॉट बुकिंग सकाळी ६ वाजता केल्यावर लसीकरणाचे ठिकाण, वेळ, दिनांकाचा संदेश मोबाईलवर आल्यावर लसीकरणासाठी येता येईल. सकाळी १० वाजेपासून लसीचा साठा उपलब्ध असेपर्यंत लसीकरण सुरू राहील. १८ ते ४४ वयोगटाव्यतिरिक्त अन्य वयोगटाचे लसीकरण आर्ट गॅलरी येथे होणार नाही.
४५ आणि त्यावरील वयोगटातील नागरिकांना कोविशिल्ड लसीचा पहिला डोस आणि दुसरा डोस डोंबिवली पूर्व भागातील एकतानगर समाजमंदिर हॉलच्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध करून दिला जाईल.