गोवरचा सव्र्हे करतांना, अनंत अडचणींचा सामना

By अजित मांडके | Published: November 28, 2022 04:27 PM2022-11-28T16:27:33+5:302022-11-28T16:27:48+5:30

गोवरला रोखण्यासाठी ठाणे  महापालिकेने पावले उचलली असली तरी देखील मुंब्रा व इतर भागात सव्र्हेक्षण करण्यासाठी जाणा:या पथकांना वाईट अनुभव येत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

While investigating measles, one faces endless difficulties | गोवरचा सव्र्हे करतांना, अनंत अडचणींचा सामना

गोवरचा सव्र्हे करतांना, अनंत अडचणींचा सामना

Next

ठाणे :

गोवरला रोखण्यासाठी ठाणे  महापालिकेने पावले उचलली असली तरी देखील मुंब्रा व इतर भागात सव्र्हेक्षण करण्यासाठी जाणा:या पथकांना वाईट अनुभव येत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. तोंडावर दरवाजा आपटणो, सव्र्हेला विरोध करीत थेट पथकाच्या अंगावर अख्खी सोसायटी धावून जाणो, घरात असतांनाही बाहेरुन कुलुप लावून घरात नसल्याचे भासविणो, आता नको नंतर या असे अक्षरश: पिटाळून लावण्याचे प्रकार सुरु असल्याने गोवरचा अटकाव करायचा कसा असा पेच त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे.

ठाण्यात मागील काही दिवसापासून गोवरच्या संख्या वाढत आहे. त्यामुळे गोवरला आळा घालण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून लसीकरण मोहीम आणि सव्र्हे सुरु करण्यात आला आहे. यामध्ये मुंब्रा, कौसा, आतकोनेश्वरनगर, शीळ आणि वर्तकनगर या आरोग्य केंद्रावर भर दिला जात आहे. ठाणे  महापालिका हद्दीत आजच्या घडीला २७४ जणांचे सम्पल घेण्यात आले होते. त्यातील ५४ जणांना गोवरची लागण झाल्याचे आढळून आले आहे. त्यातील ३६ रुग्ण पार्कीग प्लाझा आणि १४ रुग्णांवर कळवा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यामध्ये ० ते ५ या वयोगटातील ७० टक्के, ६ ते १५ वयोगट - २९ टक्के आणि १५ ते १८ वयोगटातील १ टक्के रुग्णांचा समावेश आहे. यातील बहुतेकांनी गोवरची लस घेतली नसल्याचेच तपासणीत आढळून आले आहे.
गोवरला रोखण्यासाठी महापालिकेने मुंब्रा व इतर भागात सव्र्हे सुरु केला आहे. मात्र मुंब्य्रात सव्र्हे करण्यासाठी जाणा:या महापालिकेच्या पथकाला अतिशय वाईट अनुभव येत असल्याचे दिसून आले आहे.

अमृत नगर भागात सव्र्हेसाठी गेलेल्या पथकाला इमारतीमधील सर्व रहिवासी मारहाण करण्यासाठी धावून आल्याचे गंभीर बाब पुढे आली आहे. एका ठिकाणी तोंडावर दरवाजा बंद करण्यात आला. त्यात पथकातील एका कर्मचा:याची बोटे दरवाज्यात अडकल्याचेही दिसून आले. त्यातही घरात असतांना बाहेरुन कुलुप लावून घेऊन घरातच लपून बसण्याचे प्रमाणही या भागात अधिक असल्याचे सव्र्हेत दिसून आले आहे. लसीकरण आज नको उद्या या असे सांगून दुसऱ्या दिवशी घराला टाळे लावून बाहेर निघून जाणो असे काही प्रकार घडले आहेत. त्यामुळे सव्र्हे आणि लसीकरण करायचे कसे असा पेच महापालिकेच्या पथकांना सतावू लागला आहे.

शाळा व्यवस्थापनाने देखील यात लक्ष घालण्याचे गरजेचे आहे. त्यानुसार शाळेतील शिक्षकांनी एखाद्या मुलाला ताप आला असेल तर त्याला लागलीच घरी पाठविणो गरजेचे असल्याचे पालिकेने सांगितले. तसेच लसीकरणाबाबत चित्रफीतीच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे.

गोवरचे लसीकरण करण्यावर भर दिला जात आहे. तसेच सव्र्हेवर देखील भर दिला जात आहे. सव्र्हेसाठी १६० पथके तयार करण्यात आली आहेत. त्यांच्या माध्यमातून पहिल्या टप्यातील सव्र्हे झाला आहे. दुसऱ्या टप्यातील सव्र्हे सुरु आहे. तो पूर्ण झाल्यावर पुन्हा सव्र्हेचे काम तिस:या टप्यात सुरु होणार आहे. जेणोकरुन गोवरची साखळी आताच रोखणो त्यामुळे शक्य होणार आहे. (अभिजित बांगर - आयुक्त, ठामपा)

Web Title: While investigating measles, one faces endless difficulties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.