अंबरनाथमध्ये खेळताना मित्रानेच मित्राला पेट्रोल टाकून पेटवले
By पंकज पाटील | Updated: December 10, 2023 16:46 IST2023-12-10T16:45:18+5:302023-12-10T16:46:58+5:30
अंबरनाथ मधील सिद्धार्थ नगरमध्ये एका अल्पवयीन मुलाने दुसऱ्या अल्पवयीन मुलाच्या अंगावर पेट्रोल टाकून आग लावल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

अंबरनाथमध्ये खेळताना मित्रानेच मित्राला पेट्रोल टाकून पेटवले
पंकज पाटील,अंबरनाथ: अंबरनाथ मधील सिद्धार्थ नगरमध्ये एका अल्पवयीन मुलाने दुसऱ्या अल्पवयीन मुलाच्या अंगावर पेट्रोल टाकून आग लावल्याचा धक्कादायक प्रकार अंबरनाथ मध्ये घडला आहे. त्यामध्ये अकरा वर्ष मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी शासकीय छाया उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अंबरनाथमधील सिद्धार्थ नगरमध्ये जखमी अकरा वर्षीय मुलगा वंश कांबळे हा आपल्या वयाच्या मित्रांसोबत खेळत होता आणि खेळ खेळामध्ये त्याच्या एका मित्राने त्याच्या वर पेट्रोल टाकले आणि दुसऱ्या ने त्याच्या अंगाला माचिस ची काडी पेटवून लावली. यावेळी जखमी मुलाने आग विझवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.
मात्र त्याला आग काही विझवायला जमले नाही आणि आग विझवायला तो घरी आला ,तेव्हा त्याच्या पालकांनी त्याचा जळत असलेल्या शर्ट वर पाणी टाकून ती आग विझविली,या घटनेत मुलगा गंभीररित्या भाजला असून ,त्याच्यावर छाया रुग्णालयात उपचार सुरू आहेत.