रेतीचे परवाने दिले कुणी?

By admin | Published: August 9, 2016 02:13 AM2016-08-09T02:13:15+5:302016-08-09T02:13:15+5:30

वसईच्या तहसीलदारांनी ५ मंडळ अधिकारी, १५ तलाठी १ पोलीस निरिक्षक, १ सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्यासह मोठा फौजफाटा घेऊन वैतरणा रेल्वे पुलाजवळ चालणाऱ्या रेती

Who gave permission for sand permit? | रेतीचे परवाने दिले कुणी?

रेतीचे परवाने दिले कुणी?

Next


पारोळ/वसई: वसईच्या तहसीलदारांनी ५ मंडळ अधिकारी, १५ तलाठी १ पोलीस निरिक्षक, १ सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्यासह मोठा फौजफाटा घेऊन वैतरणा रेल्वे पुलाजवळ चालणाऱ्या रेती उत्खनांनवर कारवाई करून २२ बोटी, ३ पंप, ३ डिझेल इंजिन व अनधीकृत झोपडयांवर कारवाई करून त्या नष्ट करण्यात आल्या. मोठा गवगवा करून महाड अपघाताच्या पार्श्वभूमीवर कारवाईची हौस भागवून घेतली प्रशासनाने वैतरणा परिसरात कारवाई केली असली तरी मागील वर्षी वैतरणेसाठी डुबीचे रेती परवाने शासनाने मंजूर केले. हे परवाने डुबीचे असले तरी उपसा मात्र सक्शन पंपाने केला. तो ही रेल्वे पुलाजवळून या परवान्यामुळे या परिसरात मोठा रेती उपसा झाला. त्यामुळे या पुलाला धोका निर्माण झाला या गंभीर बाबींकडे प्रशासनाने आधी लक्ष का दिले नाही या कारवाईमध्ये भाग घेणाऱ्या यंत्रणा झोपल्या होत्या का. हा प्रश्न परिसरातील नागरीकांना पडला आहे. रेल्वे प्रशासनाने २०१२ ला या भागात रेती उत्खनन करू नये अन्यथा रेल्वे पुलाला धोका आहे असे प्रशासनाला कळवले असतांनाही महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाला हाताशी धरून नदीची खोली ८० फूट असताना ती ती ४ ते ५ फूट दाखवून बनावट जागेचा सर्व्हे देऊन या भागाती रेती व्यवसायीकांनी डुबी रेतीचे परवाने आणले. पण उपसा मात्र सक्शनपंपाने केला यामुळे नदीची खोली ८० ते ९० फूट होऊन पुलाला धोका झाला. त्यामुळे कळत नकळत का होईना या नदीच्या खोलीत प्रशासनाचेही हात अडक ले असल्याची चर्चा या परिसरात रंगली आहे. (वार्ताहर)

Web Title: Who gave permission for sand permit?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.