म्हातारीला सोडून पळणारा तो हमाल कोण?

By admin | Published: August 30, 2016 02:40 AM2016-08-30T02:40:41+5:302016-08-30T02:40:41+5:30

ज्येष्ठ नागरिकांना घरात चांगली वागणूक मिळत नाही. उतारवयात त्यांना घरची मंडळी वाऱ्यावर सोडून देतात. त्यासाठी कायदेशीर बंधने घालण्याची वेळ सरकारवर आली

Who is going to leave the old man? | म्हातारीला सोडून पळणारा तो हमाल कोण?

म्हातारीला सोडून पळणारा तो हमाल कोण?

Next

कल्याण : ज्येष्ठ नागरिकांना घरात चांगली वागणूक मिळत नाही. उतारवयात त्यांना घरची मंडळी वाऱ्यावर सोडून देतात. त्यासाठी कायदेशीर बंधने घालण्याची वेळ सरकारवर आली, पण परिस्थितीत फरक पडलेला नसल्याचे कल्याण रेल्वे स्थानकातील घटनेतून उघड झाले. एका जख्ख म्हातारीला हमाल व्हीलचेअरवर घेऊन आला. तिला त्याने रुक्मिणीबाई रुग्णालयात भरती करण्याचा प्रयत्न केला. मात्र, रुग्णालयाने नकार दिल्याने त्याने तिला रुग्णालय परिसरात टाकून पळ काढला. हा प्रकार सामाजिक कार्यकर्ते दिलावर शेख यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी तिथे धाव घेतली. तिला रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. अद्याप तिची ओळख पटलेली नाही. ही महिला दाक्षिणात्य आहे. तिला सोडून पळणाऱ्या हमालाचा पोलीस शोध घेत आहेत. त्यानंतरच तिला त्याच्याकडे कोणी आणून सोडले, याचा उलगडा होण्यास मदत होईल.
हमालाने इतरांचा डोळा चुकवून त्या महिलेला त्याच अवस्थेत सोडून पळ काढला होता. दिलावर शेख याने तिला खाजगी रुग्णालयात नेले. तेथे शेख याने सामाजिक कार्यकर्ता हर्षद पुजारा याला बोलावून घेतले. तिची बिकट अवस्था पाहून तिच्या उपचाराचा खर्च करण्याची तयारी पुजारा यांनी दर्शवली. त्यानंतर, तिला रेल्वे स्थानकात एम्स रुग्णालयाने सुरू केलेल्या आपत्कालीन कक्षात भरती केले. (प्रतिनिधी)

Web Title: Who is going to leave the old man?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.