नवरा आला गं, दादा, दारू ला जबाबदार कोण?
By admin | Published: November 7, 2016 02:26 AM2016-11-07T02:26:39+5:302016-11-07T02:26:39+5:30
सध्या आर.टी.ओ.च्या आशीर्वादाने वाहनांना आपल्या पसंतीच्या वाहन मालकांना नंबर दिले जातात मात्र त्या नंबर ने नवरा आला गं, दारू, दादा अशा प्रकारे नंबरप्लेट लावून गाड्या सुसाट
आरिफ पटेल, मनोर
सध्या आर.टी.ओ.च्या आशीर्वादाने वाहनांना आपल्या पसंतीच्या वाहन मालकांना नंबर दिले जातात मात्र त्या नंबर ने नवरा आला गं, दारू, दादा अशा प्रकारे नंबरप्लेट लावून गाड्या सुसाट वेगाने फिरतात मात्र पोलीस व आर टी ओ बघे झाले आहेत.
नवीन वाहन घेतले की, २०/ २५ हजार जास्त पैसे देऊन आपल्या पसंतीची अक्षर जुळतील असा नंबर घेऊन व आपले डोके वापरून पेंटर कड्ून एम.एच.२३ जी. त्याच्या नवरा खाली आला गं, एम.एच. ०१ पी.पी. दारू असे काहीही लिहले जाते. एका वाहनावर लिहीले होते दादा असे अनेक फॅन्सी नंबर कार, जीप गाड्यांवर लिहीलेले आहेत. त्या रस्त्यावरून पोलीस व आरटीओच्या समोरून जा ये करतात त्या वाहनांना बघून अधिकारी हसतात, एकमेकाला दाखवतात. मात्र त्यांना अडवून कारवाई करत नाही असे नंबर टाकून कायद्याची पायमल्ली होत आहे अशी वाहने अपघात करून पळून गेली तर त्या वाहनाचा नंबर कसा शोधायचा असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे. नवरा, दारू, दादा म्हणजे कोणता नंबर? अशा फॅन्सी नंबर प्लेट मिरविणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी अशी मागणी आहे.
पालघर हा सागरी आणि गुजरातच्या सीमेलगतचा जिल्हा आहे. येथे अणुऊर्जा प्रकल्प आहे, रिलायन्सचा प्रकल्प आहे. तारापूर येथे तसेच बोईसरला अवाढव्य एमआयडीसी आहे. अशा स्थितीत दहशत वादी आणि अतिरेकी यांचा धोका असताना अशा नंबर प्लेटस कशा काय? वापरू दिल्या जातात. त्याचा फायदा घेऊन जर कुणी घातपात घडवला तर त्याची जबाबदारी टाकणार कोणावर?