सेनेचे उमेदवार गेले कुणीकडे ?
By admin | Published: October 16, 2015 01:58 AM2015-10-16T01:58:38+5:302015-10-16T01:58:38+5:30
संघर्ष समितीच्या २७ गावांतील पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीवर टाकलेल्या बहिष्कारास न जुमानता शिवसेनेने २१ पैकी १९ प्रभागांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करून एक प्रकारे निवडणुकीचा शंख फुंकला.
म्हारळ : संघर्ष समितीच्या २७ गावांतील पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीवर टाकलेल्या बहिष्कारास न जुमानता शिवसेनेने २१ पैकी १९ प्रभागांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करून एक प्रकारे निवडणुकीचा शंख फुंकला. परंतु, शिवसेनेचे उमेदवार नॉट रिचेबल झाल्याने साऱ्यांची अडचण झाली आहे. १६ आॅक्टोबरच्या माघारीनंतरच याचे चित्र स्पष्ट होणार आहे.
यामुळे कितीही केले तरी कल्याण-डोंबिवलीच्या सार्वत्रिक निवडणुकीवर सर्वपक्षीय बहिष्कार घालायचाच, असा निर्धार केलेल्या संघर्ष समितीलाही नाइलाजास्तव निवडणुकीच्या रिंगणात उतरावे लागले. त्यासोबत, भाजपा आणि मनसेनेदेखील ऐन वेळी उमेदवारी दाखल केली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत २७ गावांचे निवडणुकीवर लक्ष लागले होते. बहिष्कार अथवा निवडणुकीला सामोरे जावे लागेल, असे प्रश्न पडले होते. त्यात, उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. तोही निर्णय लांबल्यामुळे पालिकेच्या निवडणुका आता अटळ झाल्या आहेत. (वार्ताहर)