कोण होणार स्थायी सभापती? म्हात्रे की मोरे?

By admin | Published: January 2, 2017 03:47 AM2017-01-02T03:47:37+5:302017-01-02T03:47:37+5:30

केडीएमसीच्या स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक बुधवारी होत आहे. सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत.

Who will be the permanent speaker? More of Mhatre? | कोण होणार स्थायी सभापती? म्हात्रे की मोरे?

कोण होणार स्थायी सभापती? म्हात्रे की मोरे?

Next

कल्याण : केडीएमसीच्या स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक बुधवारी होत आहे. सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत. मागचे सभापतीपद भाजपाकडे होते, तर यंदा ते सेनेकडे आहे. त्यामुळे शिवसेनेतील ज्येष्ठ सदस्य रमेश सुकऱ्या म्हात्रे आणि राजेश मोरे यांच्यात खरी स्पर्धा आहे. त्यामुळे कोणत्या सदस्याला उमेदवारी मिळते, याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे.
बुधवारी दुपारी १ वाजता निवडणूक होणार असून पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर उपस्थित राहणार आहेत. केडीएमसीच्या स्थायी समितीतील १६ सदस्यांपैकी ८ सदस्य निवृत्त झाले. यात शिवसेना ४, भाजपा ३ आणि काँग्रेसच्या एका सदस्याचा समावेश होता. स्थायीच्या निवृत्त ८ सदस्यांच्या जागी नव्या सदस्यांची निवड ३० नोव्हेंबरच्या विशेष महासभेत झाली. सभापतीपद शिवसेनेकडे असल्याने त्या पक्षातील बहुतांश नगरसेवक स्थायीवर जाण्यास इच्छुक होते. यात या आधी सभापतीपद भूषवलेल्यांत मोठ्या प्रमाणावर स्पर्धा होती. यात माजी सभापती व ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी बाजी मारत स्थायीचे सदस्यपद पटकावले. (प्रतिनिधी)

Web Title: Who will be the permanent speaker? More of Mhatre?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.