कोण होणार प्रिन्सेस आॅफ ठाणेकर?
By admin | Published: October 11, 2016 02:45 AM2016-10-11T02:45:05+5:302016-10-11T02:45:05+5:30
लोकमत युवा नेक्स्ट आणि एलटीए आयोजित प्रिन्सेस आॅफ ठाणेकर स्पर्धेची उत्कंठा वाढलेली असून अंतिम सोहळा १२ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ६
ठाणे : लोकमत युवा नेक्स्ट आणि एलटीए आयोजित प्रिन्सेस आॅफ ठाणेकर स्पर्धेची उत्कंठा वाढलेली असून अंतिम सोहळा १२ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता कोरम मॉल, ठाणे (प.) येथे रंगणार आहे. या स्पर्धेला ठाणेकर युवतींनी उदंड प्रतिसाद दिला असून १६ जणींमध्ये ही स्पर्धा होणार आहे.
व्यक्तिमत्त्व, सौंदर्य, बुद्धिमत्ता या विविध प्रकारातील गुणवत्तेवरून प्रिन्सेस आॅफ ठाणेकर विजेती निवडण्यात येणार आहे. या स्पर्धेत प्रथम फेरी स्वओळख आणि द्वितीय फेरी प्रश्नोत्तराची असणार आहे. जश्न आणि फ्युजन बीटस् हे कार्यक्रमाचे स्टाईल पार्टनर असणार आहेत.
कार्यक्रमाला कोरम मॉल, ठाणे, हॅथवे केबल, केबल इन, जश्न, फ्युजन बीटस्, वूड क्राफ्ट यांचे सहकार्य लाभले आहे. सौंदर्य स्पर्धेतील विजेतीला एलटीएची ब्रॅण्ड अॅम्बेसिडर बनण्याची संधी मिळणार आहे. (प्रतिनिधी)ग्रुमींग सेशनमध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक विजू माने यांनी स्पर्धेतील युवतींची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. आत्मविश्वास हा स्पर्धेसाठी महत्त्वाचा असून तो तुमच्या डोळ्यात दिसला पाहिजे, अशा शब्दात त्यांनी स्पर्धकांना मार्गदर्शन केले. प्रिन्सेस आॅफ ठाणेकर स्पर्धेतील अंतिम तीन विजेत्यांना त्यांच्या पुढील चित्रपटात काम करण्याची संधी मिळणार आहे. तसेच वेबसिरीजमध्येही संधी देतील, अशी घोषणाही त्यांनी केली. त्यामुळे युवतींमधील उत्साह आणि स्पर्धेची चुरस वाढली आहे. - विजू माने, दिग्दर्शक
प्रिन्सेस आॅफ ठाणेकर स्पर्धेसाठी खास सेलिब्रेटी व परिक्षक म्हणून अभिनेता संतोष जुवेकर उपस्थित राहणार आहेत. जुवेकर यांनीही सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच जास्तीत जास्त युवक-युवतींनी या सर्व स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
- संतोष जुवेकर, अभिनेता