देशाचा पुढचा पंतप्रधान कोण असेल? चंद्रशेखर बावनकुळे माईक घेऊन थेट दुकानात...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 06:42 PM2023-10-17T18:42:44+5:302023-10-17T18:42:51+5:30
भाजपच्या महाविजय २०२४ अभियानांतर्गत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मंगळवारी ठाणे दौऱ्यावर होते.
ठाणे : लोकसभा प्रवास अंतर्गत मंगळवारी भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाण्यातील बाजारपेठेतून रॅली काढून येथील व्यापारी आणि ग्राहकांशी संवाद साधत मतांचा जोगवा मागितला. त्यातही बावनकुळे यांच्या समवेत स्थानिक पदाधिकारी देखील यात सहभागी असल्याने मनात नकार असतांनाही विरोध करणार कोण अशी द्विधा मनस्थिती ग्राहक आणि व्यापाºयांची झाल्याचे दिसून आले. त्यामुळे तुम्हाला पंतप्रधान कोण हवाय या प्रश्नावर सर्वांनीच नरेंद्र मोदी हेच उत्तर दिले.
भाजपच्या महाविजय २०२४ अभियानांतर्गत लोकसभा प्रवास योजनअंतर्गत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मंगळवारी बावनकुळे ठाणे दौºयावर होते. या दौºयासाठी भाजपने जोरदार तयारी केली होती. बाजारपेठ, मुख्य चौकात भाजपकडून फलकबाजी करण्यात आली होती. बावनकुळे यांनी सकाळी गडकरी रंगायतन येथे भाजपने नियुक्त केलेल्या एक हजार कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी ठाण्यातील तहसील कार्यालय ते जांभळीनाका पर्यंत व्यापारी, भाजी विक्रेते, ग्राहक यांच्याशी संवाद साधण्यास सुरूवात केली. यावेळी त्यांच्या भोवती मोठ्याप्रमाणात कार्यकर्ते होते. काही कार्यकर्त्यांनी चेहºयावर बावनकुळे यांचा मुखवटा बसविला होता.
येथील दुकानामध्ये बावनकुळे थेट माईक घेऊन जात असल्याने व्यापाºयांमध्ये आणि ग्राहकांमध्ये गोंधळ उडत होता. त्यामुळे बावनकुळे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर मनात नसतांनाही त्यांना जे हवे तेच बोलावे लागल्याचे दिसून आले. या पुढचा पंतप्रधान कोण असेल? पुन्हा मोदीच का हवेत? असे प्रश्न बावनकुळे हे व्यापारी आणि ग्राहकांना विचारत होते. पण माईकच समोर आल्याने मनात नकार असतांनाही होकार द्यावा लागत असल्याचे दिसून आले.
एका व्यापाºयाने पुढील १०० वर्षे आम्हाला मोदीच पंतप्रधान हवेत असे सांगत जय श्री रामह्णची घोषणा दिली. तर काहीजण भाजपचे झेंडे आणि कार्यकर्त्यांचा गराडा पाहून पुढचे पंतप्रधान मोदी हवेत असे म्हणत होते. परंतु मोदी का हवेत याची उत्तरे देताना ते भांबावत होते. तर एका महिलेने जो आमची कामे करेल आम्ही त्यांना निवडून देऊ असे म्हणत बावनकुळे यांच्या प्रश्नांची उत्तरे टाळली.
भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी लाभार्थी म्हणून येऊरच्या आदिवासी महिलांना बोलावले होते. बावनकुळे यांची प्रतिक्षा करत या महिला एका सावलीमध्ये उभ्या होत्या. महिलांच्या हाती मी लाभार्थी अशा आशयाचे फलक देण्यात आले होते. या फलकाविषयी काही महिलांना विचारले असता, त्यांना आपण कसले लाभार्थी आहोत याची उत्तरे देता आली नाही. त्यानंतर एका महिलेने आम्हाला मोफत घरगुती सिलिंडर मिळाल्याचे सांगितले. आम्हाला सिलिंडरचा दर परवडत नसल्याने बºयाचदा जेवण चुलीवरच बनवत असल्याचे सांगितले.
बाजारपेठेत नवरात्रौत्सवानिमित्ताने खरेदी करण्यासाठी आलेल्या काही ग्राहकांना नेमका कसला प्रकार सुरू आहे याची माहिती नव्हती. भाजपचा हा कार्यक्रम एकप्रकारे निवडणूकीची प्रचार रॅली असल्याची चर्चा सुरू होती. या रॅलीमुळे बाजारपेठेतील बसची वाहतुक तलवापाली मार्गे वळविली होती. त्यामुळे या मार्गावर काहीकाळ वाहतुक कोंडी झाल्याचे चित्र होते.