स्पाच्या आड देहविक्री, व्यवस्थापक महिलेस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 12:01 AM2019-07-11T00:01:19+5:302019-07-11T00:01:23+5:30

पेणकरपाड्यातील अजित पॅलेस हॉटेल गल्लीत डी-पॅरेडाईज या नावाने चालवण्यात येणाºया स्पा सेंटरच्या आड वेश्या व्यवसाय चालवला जात असल्याची माहिती

The whole body of the spas, the manager arrested the woman | स्पाच्या आड देहविक्री, व्यवस्थापक महिलेस अटक

स्पाच्या आड देहविक्री, व्यवस्थापक महिलेस अटक

Next

मीरा रोड : स्पाच्या आड चालणाऱ्या वेश्या व्यवसायप्रकरणी काशिमीरा पोलिसांनी व्यवस्थापक महिलेस अटक केली असून, स्पाच्या मालकाचा शोध सुरू आहे.


पेणकरपाड्यातील अजित पॅलेस हॉटेल गल्लीत डी-पॅरेडाईज या नावाने चालवण्यात येणाºया स्पा सेंटरच्या आड वेश्या व्यवसाय चालवला जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे यांना मिळाली. शिंगारे, उपनिरीक्षक चेतन पाटीलसह राजेश पानसरे, श्रीमंत जेधे, गुळदगडे, सुरडकर यांनी सापळा रचून बनावट गिºहाईक पाठवले.


स्पामधील व्यवस्थापक चित्रा संजय माने, रा. जनता बँकेच्या मागे, वसई हिने वेश्या व्यवसायासाठी या चार बनावट ग्राहकांसमोर तरुणी उभ्या केल्या. साडेतीन हजारात एका तरुणीचा सौदा ठरल्यानंतर त्या गिºहाइकाने पोलिसांना मिस कॉल देऊन सावध केले. त्यासरशी पोलिसांनी छापा टाकून चित्राला अटक केली. चार पीडित तरुणींची येथून सुटका केली. या स्पाचा मालक हनिफ शेख असून, पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.


बारच्या आड अश्लील नृत्य
काशिमीरा पोलीस ठाण्यासमोरील नाक्यावर असलेल्या नाइट मीटिंग या बारमध्ये आॅर्केस्ट्राच्या आड अश्लील नृत्य चालत असल्याचा प्रकार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेने टाकलेल्या छाप्यातून उघड झाला आहे. बारच्या सहा कर्मचाऱ्यांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. काशिमीरानाका येथील नाइट मीटिंग बारमध्ये अश्लील नाच चालत असल्याची माहिती मिळाल्यावर सहायक निरीक्षक देविदास हंडोरेसह आबा चौधरी यांनी बनावट गिºहाईक पाठवून आतील नृत्याचे गुप्त छायाचित्रण करून घेतले. त्यानंतर छापा टाकून बारच्या व्यवस्थापकासह सहा जणांना अटक केली.

Web Title: The whole body of the spas, the manager arrested the woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.