बटलू गद्दार म्हणून आव्हाडांनी कोणाला हिणवले; राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा निर्धार
By अजित मांडके | Published: January 28, 2023 04:48 PM2023-01-28T16:48:11+5:302023-01-28T16:48:38+5:30
यातील बटलू गद्दार कोण याची चर्चा मात्र आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : माझा बंधुतुल्य सहकारी जितू पाटील जो मागच्या निवडणूकीत निवडून आला होता, त्याला वेगवेगळी आमिष दाखवून पैशेवाल्यांच्या सेनेत घेण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यासाठी बटलू गद्दार हा प्रामाणिक प्रयत्न करतोय. आता मोरयासारखे जाऊन तिथे ४-४ तास त्याच्या घरी बसाल, तर तो काय घरातून हालकून देईल. पण आपण किती वेळ कोणाच्या घरी बसावं ह्याची तर लाज बाळगा. लोचटासारखे किती वेळ बसाल. असा मेसेज सध्या सोशल मिडियावर आव्हाडांनी टाकला असून तो वायरल झाला आहे. मात्र यातील बटलू गद्दार कोण याची चर्चा मात्र आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
मागील काही दिवसापासून मुंब्य्रातील राष्ट्रवादीचे काही माजी नगरसेवक वेगळी चुल मांडण्याच्या तयारीत आले आहेत. त्यानुसार मुंब्रा विकास आघाडी खुली करुन आव्हाडांना हेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच शहरातील काही माजी नगरसेवक देखील येत्या काही दिवसात बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र हे होत असतांना राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांना कशा पध्दतीने अमिष दाखविले जात आहे, याचा मेसेज शुक्रवारी आव्हाड यांनी टीट¦रच्या माध्यमातून वायरल केला आहे. यात माजी नगरसेवकाला १ कोटीची अमिष दाखवून त्याला आपल्यात खेचण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
दरम्यान हे होत असतांना आता राष्ट्रवादीचे विटावा भागातील माजी नगरसेवक जितू पाटील यांनी शुक्रवारी आनंद आश्रममध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली. त्यात त्यांना त्याठिकाणी घेऊन जाणारा देखील राष्ट्रवादीचा माजी नगरसेवक असल्याची माहिती बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाच्या सुत्रंनी दिली. त्यानंतर आव्हाड यांनी जितू पाटील यांच्या घरी जाऊन त्यांची मनधरणी केली असून त्यानंतर त्यांनी जितू पाटील यांच्या भेटीचे फोटो आणि काही महत्वाचा मेसेज सोशल मिडियावर टाकला आहे.
यात जितू पाटील याला देखील कसे अमिष दाखवून पैशावाल्याच्या शिवसेनेत घेण्याचा प्रयत्न केला जात आहे, हे सांगितले आहे. परंतु त्यासाठी बटलू गद्दार हा प्रामाणिक प्रयत्न करतोय. सगळेच धंदा करायला बसलेत आणि स्वत:चा विक्र ीचा रेट लावतायेत असे समजू नका. काही स्वाभिमानी माणसं सुद्धा ह्या जगात जिवंत आहेत. पैशाने सगळ्यांनाच विकत घेता येतं हा डोक्यातला भ्रम काढून टाका. परंतु हा बटलू गद्दार कोण असा सवाल उपस्थित झाला असून त्याची मात्र जोरदार चर्चा ठाण्यातील राजकीय वातावरणात केली जात आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"