मराठी साहित्य उणे का ते तपासा?
By admin | Published: January 12, 2017 07:14 AM2017-01-12T07:14:18+5:302017-01-12T07:14:18+5:30
परदेशात एकच इंग्रजी भाषा आहे. आपल्याकडे २२ भाषा आहेत.
ठाणे : परदेशात एकच इंग्रजी भाषा आहे. आपल्याकडे २२ भाषा आहेत. आपण भाषेने श्रीमंत आहोत हे नमूद करतानाच कन्नड भाषेला आठ ज्ञानपीठ पुरस्कार मिळतात मग आपण मराठी साहित्यिक कुठे कमी पडतो हे तपासण्याची गरज आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीनारायण बोल्ली यांनी कान टोचले.
आई वडिल आणि वाचनालयामुळे माझ्यावर वाचनाचे संस्कार झाले. हल्लीच्या पिढीला वाचनाची आवड नसेल तर त्याला त्यांचे पालक बहुतांशी जबाबदार असल्याची टीका ज्येष्ठ साहित्यिका उमा कुलकर्णी यांनी केली.
ज्येष्ठ साहित्यिक बोल्ली आणि कुलकर्णी यांनी वाचनाची आवड कशी निर्माण झाली हा प्रवास श्रोत्यांसमोर उलगडला.
कुलकर्णी म्हणाल्या की, वाचनाची आवड आमच्या पिढीला सहज होती. भाषा हे जिवंत माध्यम आहे ते वापरलं नाही तर ती मरते. एखादी कलाकृती आवडली तर ती अनुवादीत करताना मूळ लेखकाची परवानगी घ्यावी लागते. अनुवाद करणे हे सोपे नाही. त्यात अडचणी येत असतात. अनुवादात श्रम असले तरी ते आनंदाने करायचे असते. पुन:पुन्हा लिखाण महत्त्वाचे आहे. गोळा बेरीज करुन अनुवादन केले तर फजिती होते असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)