पालकमंत्री शिष्टमंडळासह निवडणुक आयोगाकडे का गेले होते? आनंद परांजपे यांचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2022 07:18 PM2022-02-11T19:18:25+5:302022-02-11T19:18:36+5:30
प्रभाग रचना अंतिम करतांना त्याबाबत कोणत्याही प्रकारची बैठकही न होता ही प्रभाग रचना तयार कशी झाली असा सवालही त्यांनी केला. त्यातही प्रभाग रचनेत राष्ट्रवादीने हस्तक्षेप घेतलेला नाही, त्यामुळे त्यांना तसे वाटत असेल तर त्यांनी 14 तारखेला हरकत घ्यावी असेही त्यांनी स्पष्ट केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : महापौर नरेश म्हस्के यांनी आरोप केल्यानंतर महापालिकेने तयार केलेली प्रभाग रचना ही जशीच्या तशी ठेवण्यासाठी ठाणो जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या शिष्टमंडळासह प्रभाग रचना जाहीर होण्याच्या एक दिवस आधी गेले असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी केला आहे.
यासाठी तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासावेत, त्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्यासह खासदार, दोन आमदार महापौर नरेश म्हस्के आणि काही नगरसेवक गेले होते. ते निवडणुक आयोगावर दबाव टाकण्यासाठी गेले होते का? असा उलट सवाल त्यांनी केला आहे. राष्ट्रवादीला कोणताही जुना आराखडा मिळाला नव्हता. परंतु त्यात काही तरी गडबड असल्याचे समजल्यानेच आव्हाड यांनी पत्र दिल्याचेही त्यांनी सांगितले. ेत्यातही म्हस्के यांना जर गोपनियता भंग झाले असे वाटत असेल तर त्यांनी पोलीस आयुक्तांकडे तक्रार करावी त्यांनी ते धाडस दाखवावे असे आव्हानही त्यांनी दिले.
प्रभाग रचना अंतिम करतांना त्याबाबत कोणत्याही प्रकारची बैठकही न होता ही प्रभाग रचना तयार कशी झाली असा सवालही त्यांनी केला. त्यातही प्रभाग रचनेत राष्ट्रवादीने हस्तक्षेप घेतलेला नाही, त्यामुळे त्यांना तसे वाटत असेल तर त्यांनी 14 तारखेला हरकत घ्यावी असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यातही गोपनीयेतचा भंग झाला असेल तर आयुक्तांच्या विरोधात तक्रार करण्याचे धाडस महापौरांनी दाखवावे. आयुक्तांनी शिवसेनेकडून उमेदवारी घ्यावी यावरुन म्हस्के यांनी परांजपे यांचा समाचार घेतला असतांनाच परांजपे यांनी म्हस्के यांच्यावर पलटवार करुन आयुक्तांनी म्हस्के यांना प्रवक्ता नेमले आहे का? असा उलट सवाल केला आहे.