डोंबिवलीतील तरण तलावाची दुरुस्ती दिवाळीच्या सुट्टीतच का?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2018 03:09 PM2018-11-01T15:09:48+5:302018-11-01T15:10:09+5:30
डोंबिवली क्रीडा संकुलातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तरण तलावाचे फिल्टर मशीन खराब झाल्याने तलावातील पाणी हिरवेशार झाले आहे.
कल्याण : डोंबिवली क्रीडा संकुलातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तरण तलावाचे फिल्टर मशीन खराब झाल्याने तलावातील पाणी हिरवेगार झाले आहे. मशीन दुरुस्तीच्या कामासाठी तलाव किमान 15 दिवसाकरीता बंद ठेवला आहे. दिवाळीच्या सुट्टीत शालेय विद्याथ्र्याना पोहण्याचा आनंद घेता येणार नाही. दुरुस्ती व देखभालीची कामे सुट्टीच्या कालावधीच का घेतली जातात यामुळे मनसेने संतप्त पावित्र घेत तरण तलावाच्या ठेकेदाराला गाठून चांगलाच दम भरला आहे. काम लवकर करा नाही तर तुमची काही खैर नाही असा सज्जड इशाराच दिला आहे.
मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. तरण तलावाच्या ठिकाणी तलाव दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आला असल्याची नोटिस लावली आहे. त्यामुळे तरण तलावात पोहण्यासाठी आलेल्या शालेय विद्याथ्र्याचा भ्रमनिरास झाला आहे. मागच्या वर्षी मनसेच्या वतीने तरण तलाव बंदीच्या विरोधात जोरदार आंदोलन केले होते. कोरडय़ा तलावात पोहण्याच्या स्पर्धा घेण्याचे प्रतिकात्मक आंदोलन घेतले होते. तसेच महापालिका आयुक्ताना क्रीडाशून्य शिरोमणी हा प्रतिकात्मक पुरस्कार देऊन तरण तलावाच्या देखभाल दुरुस्तीकडे लक्ष वेधले होते. नेहमी शालेय सुट्टीच्या काळात तरण तलाव दुरुस्तीच्या नावाखाली बंद ठेवला जातो. त्यामुळे शालेय विद्याथ्र्याना सुट्टीच्या दिवसात पोहण्याचा आनंद घेता येत नाही. तरण पटूना सराव करता येत नाही. खाजगी तरण तलाव हे विद्याथ्र्याना परवडणारे नसल्याने त्याठिकाणी विद्यार्थी जात नाही. आत्ता दिवाळीची सुट्टी लागणार असल्याने या सुट्टीच्या काळाच तरण तलाव बंद ठेवला आहे. फिल्टर मशीन दुरुस्ती करण्यासाठी तलाव बंद आहे. त्यासाठी सात लाखाचा खर्च केला जाणार आहे. अत्यावश्यक बाब म्हणून प्रशासनाकडून लाखो रुपयांचा खर्च दुरुस्ती देखभालीच्या नावाखाली केला जातो. खर्च करुनही यंत्रणा वारंवार कशी ना दुरुस्त होते असा सवाल मनसेच्या वतीने उपस्थित केला जात आहे.
तरण तलावाच्या नजीक डोंबिवली क्रीडा संकुल आहे. या क्रीडा संकुलात विविध कार्यक्रमाचे जाते. नुकताच नवरात्रीत त्याठिकाणी नमो गरबा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे क्रिडासंकुलात जो कचरा तयार झाला. तो कचरा उचलून डंपिंग ग्राऊंडवर टाकणो गरजेचे होते. महापालिकेने तो कचरा उचलून न नेता त्याच ठिकाणी जाळला. त्या कच:याच्या आगीत संकुलाच्या परिसरात लावलेली सात झाडे होरपळली आहेत. ही झाडे महापालिका जगवित नाही. त्याठिकाणी येणारे ज्येष्ठ नागरीक झाडाना पाणी घालतात. त्यांनी जगविलेले झाडे जळाली आहे. महापालिका काळजी घेत नाही. दुसरे काळजी घेतात. त्यांच्या मेहनतीवर पाणी फेरण्याचे काम करते असा आरोप कदम यांनी केला आहे.