मराठी पाट्या का नाही? ठाणे महापालिकेने बजावल्या ४७६ दुकानदारांना नोटीस

By अजित मांडके | Published: December 11, 2023 07:54 PM2023-12-11T19:54:22+5:302023-12-11T19:54:43+5:30

मराठी पाट्यांच्या मुद्यावरुन आता ठाणे महापालिकेने सुध्दा मागील काही दिवसांपासून दुकानदारांना नोटीस बजावण्यास सुरवात केली आहे.

Why no Marathi plates Thane Municipal Corporation issued notice to 476 shopkeepers | मराठी पाट्या का नाही? ठाणे महापालिकेने बजावल्या ४७६ दुकानदारांना नोटीस

मराठी पाट्या का नाही? ठाणे महापालिकेने बजावल्या ४७६ दुकानदारांना नोटीस

ठाणे: मराठी पाट्यांच्या मुद्यावरुन आता ठाणे महापालिकेने सुध्दा मागील काही दिवसांपासून दुकानदारांना नोटीस बजावण्यास सुरवात केली आहे. त्यानुसार आतापर्यंत ४७६ दुकांदाराना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मराठी पाट्याच्या बाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम २०१७ मधील कलम ३६ क नुसार दुकाने व आस्थापना यांचे नामफलक मराठीत असणे बंधनकारक आहे. 

त्यानुसार ठाणे महापालिका हद्दीतील  नऊ प्रभागसमितीच्या सहाय्यक आयुक्तांवर नामफलक मराठीत आहेत का? याबाबतची  जबाबदारी सोपविण्यात आली असून  त्यांच्यामार्फत दुकाने व आस्थापना यांचे नामफलक मराठी असतील याची तपासणी करण्यात येत आहे. त्यानुसार नऊ प्रभाग समिती अंतर्गत सहाय्यक आयुक्तांच्या मार्फत त्या त्या ठिकाणच्या आस्थापना तपासल्या जात असून ज्या आस्थापनांवर मराठीत उल्लेख नसेल अशांना नोटीस बजावल्या जात आहेत. 

  • आतापर्यंत दिलेल्या नोटीसा                                                                                                              कोपरी –नौपाडा – २८
  • माजिवडा –मानपाडा – ३४
  • लोकमान्य नगर – सावरकर नगर – ७६
  • उथळसर – १४५
  • वर्तकनगर – ०५ 
  • मुंब्रा – ४१
  • दिवा – १२०
  • वागळे – १३
  • कळवा – १४

Web Title: Why no Marathi plates Thane Municipal Corporation issued notice to 476 shopkeepers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे