निष्काळजीपणा करणाऱ्या ठाणे महापालिकेच्या त्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाई का नाही? : मनसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 07:30 PM2019-05-08T19:30:24+5:302019-05-08T19:33:06+5:30

खेळाचे मैदान सुरक्षित न ठेवणाºया ठाणे महापालिकेच्या त्या अधिकाºयांविरोधात आयुक्त कारवाई का करीत नाही असा सवाल मनविसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप पाचंगे यांनी उपस्थित केला आहे.

Why not take action against those officers of the Thane Municipal Corporation negligent? : MNS | निष्काळजीपणा करणाऱ्या ठाणे महापालिकेच्या त्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाई का नाही? : मनसे

निष्काळजीपणा करणाऱ्या ठाणे महापालिकेच्या त्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाई का नाही? : मनसे

googlenewsNext
ठळक मुद्देनिष्काळजीपणा करणाऱ्या त्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाई का नाही? : मनसेख्रिश्चन धर्मीयांनी अनधिकृतरित्या दफनविधी केल्याची घटना निंदनीयच : संदीप पाचंगेभूखंड अन्य कोणत्याही कारणासाठी वापरला जावू नये

ठाणे: वर्तकनगर येथील खेळाच्या मैदानासाठी असलेल्या आरक्षित भूखंडात काही दिवसांपुर्वी ख्रिश्चन धर्मीयांनी अनधिकृतरित्या दफनविधी केल्याची घटना घडली होती. सदर बाब ही निंदनीयच आहे. परंतू तेवढीच चूक ही त्या जागेबाबत निष्काळजीपणा बाळगणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांची देखील आहे. या अधिकाºयांविरोधात महापालिका प्रशासन कोणती कारवाई करणार?असा सवाल मनसेने आपल्या निवेदनातून उपस्थित केला आहे.
           ठाणे शहरातील वर्तकनगर येथे खेळाचे मैदानासाठी आरक्षित असलेल्या भूखंडात ख्रिश्चन धर्र्मियांनी अनधिकृतरित्या दफनविधी केल्यामुळे परिसरातील सामाजिक वातावरण दूषित झाले आहे असा आरोप मनविसे ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप पाचंगे यांनी केला. या घटनेत संबंधितांविरोधात गुन्हा देखील दाखल झाला आहे. या जागेचा टी.डी.आर. हिरानंदानी विकासकाला मिळाल्यामुळे खेळाचे मैदान ठा.म.पा. च्या मालकीचे आहे. त्यामुळे सदर जागेची देखभाल करणे, त्या जागेभोवती कुंपण घालून त्याची काळजी घेणे हे पालिकेच्या संबंधित अधिकाºयांचे कर्तव्य आहे. पालिका अधिकाºयांच्या या निष्काळजीपणामुळे आज दफनविधी सारखा भयंकर प्रकार घडला आहे, ज्या अधिकाºयांनी आपल्या कर्तव्यात कसूर केली आहे ते देखील दफनविधी करणाºया एवढेच दोषी आहेत असे पाचंगे म्हणाले. तत्कालीन महापालिका अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी ३० डिसेंबर २०१६ रोजी ख्रिश्चन धर्मीयांना लेखी पत्राद्वारे ३० हजार चौ. फूट क्षेत्र स्मशानभूमी करीता देण्यात येईल असे आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता करण्यास संबंधित अधिकारी वर्ग, श्रेय घेण्यासाठी पुढे पुढे करणारे लोकप्रतिनिधी अकार्यक्षम ठरले आहेत. सर्व धर्मीयांना अंत्यविधी करिता जागा उपलब्ध करून देणे महापालिकेचे कर्तव्य आहे. दोन्ही समाजात संघर्ष होणार नाही याची काळजी पालिका आयुक्तांनी घेऊन कर्तव्यात कसूर करणाºया अधिकाºयांवर निलंबनाची कारवाई करावी व खेळाचे मैदान म्हणून आरक्षित असलेला भूखंड अन्य कोणत्याही कारणासाठी वापरला जावू नये अशी मागणी मनविसेने पालिका आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे.

 

 

Web Title: Why not take action against those officers of the Thane Municipal Corporation negligent? : MNS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.