जंगली डुकराचा समुद्रात बुडून मृत्यू; पंचनामा करून मृतदेहाची विल्हेवाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 11:37 AM2021-01-20T11:37:30+5:302021-01-20T11:38:29+5:30

दरम्यान मंगळवारी सायंकाळी भरतीच्या वेळी त्याचा मृतदेह चौपाटी लागला.

Wild boar drowning in sea; Disposal of dead body by FIR | जंगली डुकराचा समुद्रात बुडून मृत्यू; पंचनामा करून मृतदेहाची विल्हेवाट

जंगली डुकराचा समुद्रात बुडून मृत्यू; पंचनामा करून मृतदेहाची विल्हेवाट

Next

बोर्डी- डहाणू तालुक्यातील चिखले गावच्या पवनचक्की चौपाटीवर मंगळवार, 19 जानेवारी रोजी जंगली डुक्कर मृतावस्थेत आढळले. काही दिवसांपूर्वी एक जंगली डुक्कर चिखले गावच्या वस्तीत आल्याचे स्थानिकांनी पाहिले होते. कुत्रे आणि अन्य जनावरे मागे लागल्याने ते गायब झाले होते. त्यानंतर समुद्रकिनारी भागातील सुरू बागातून फिरत ते ओहोटीच्या वेळी समुद्राच्या आत गेले असावे. हा समुद्राचा भाग खोलगट आणि खडकाळ आहे. भरतीच्या वेळी पाण्यातून बाहेर पडता न आल्याने लाटांमुळे गटांगळ्या खाऊन त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त होत आहे. 

दरम्यान मंगळवारी सायंकाळी भरतीच्या वेळी त्याचा मृतदेह चौपाटी लागला. व्यायामाला आलेल्या स्थानिकांनी त्याला पाहिल्यानंतर बोर्डी वनपरिक्षेत्र कार्यालयाला माहिती देण्यात आली. त्यानंतर वन कर्मचारी मनीष जाधव यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या टीमने सायंकाळी उशिरा पंचनामा करून त्या मृतदेहाची विल्हेवाट लावली. 

Web Title: Wild boar drowning in sea; Disposal of dead body by FIR

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.