तहसील कार्यालयाच्या आवारात रानभाज्यांचा महोत्सव
By पंकज पाटील | Published: August 23, 2023 07:36 PM2023-08-23T19:36:49+5:302023-08-23T19:36:59+5:30
अंबरनाथ तहसील कार्यालयाच्या परिसरात या रानभाज्यांच्या विक्रीचे स्टॉल लावण्यात आले होते.
अंबरनाथ: उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत अंबरनाथ पंचायत समितीच्या माध्मातून रानभाज्या महोत्सव आयोजित करण्यात आले होते. अंबरनाथ तहसील कार्यालयाच्या परिसरात या रानभाज्यांच्या विक्रीचे स्टॉल लावण्यात आले होते.
ग्रामीण भागातल्या बचत गटातील महिलांनी रानातील आणि सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या रानभाज्यांचे स्टॉल या महोत्सवात विक्रीसाठी लावले होत. यामध्ये आघाडा,शेवळा, कुलुचीभाजी, भारंग, मायाळू, कपाळफोडी,दिंडा भाजी,करटोळी,टाकळा ह्या आरोग्यास गुणकारी व औषधी भाज्यांचा समावेश होता. यावेळी तहसीलदार प्रशांती माने यांनी या महोत्सवाच उद्घाटन करून महिलांना सक्षम करण्यासाठी नागरिकांनी या रानभाज्या खरेदी कराव्यात अस आवाहन केलं.
तसेच स्वतः देखील रान भाज्यांची खरेदी केली. तसेच येत्या शुक्रवारी ठाणे जिल्हा परिषदेच्या आवारात मोठ्या प्रमाणात रानभाज्यांचा महोत्सव आयोजित करण्यात येणार असून त्यामध्ये नागरिकांनी रानभाज्यांची खरेदी करण्यासाठी यावं अस आवाहन अंबरनाथ तालुका अभियान व्यवस्थापक स्वाती तूपसुंदरे यांनी केले. आदिवासींच्या उत्पन्नाचा स्त्रोत असलेल्या राहणं भाज्या ह्या शासकीय कार्यालयांमध्ये महोत्सवाच्या माध्यमातून विक्रीसाठी ठेवण्यात येत आहे. त्यामुळे या रानभाज्यांना शासकीय ब्रँड मिळाल्याची चर्चा आहे.