एनआरसी सर्व्हेत मुंब्य्रातील ९० टक्के नागरिक अपात्र ठरणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 11:57 PM2019-09-24T23:57:02+5:302019-09-25T07:05:39+5:30

जनजागृती कार्यक्रमातून आवश्यक कागदपत्रे नसल्याचे उघड

Will 90 percent of citizens in NRC survey be disqualified? | एनआरसी सर्व्हेत मुंब्य्रातील ९० टक्के नागरिक अपात्र ठरणार?

एनआरसी सर्व्हेत मुंब्य्रातील ९० टक्के नागरिक अपात्र ठरणार?

googlenewsNext

मुंब्रा : नॅशनल रजिस्ट्रार ऑफ सिटीझन (एनआरसी) सर्व्हेबाबत नागरिकांच्या मनात असलेली भीती दूर व्हावी, भविष्यात देशात होणाऱ्या सर्व्हेला नागरिकांनी निर्भीडपणे सामोरे जावे, यासाठी जनजागृती करण्याकरिता सलाम मुंब्रा फाउंडेशन आणि हासरा एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने रविवारी मुंब्य्रात आयोजित केलेल्या जनजागृती कार्यक्रमाला उपस्थित ९० टक्के लोकांकडे सर्व्हेसाठी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.

आसाममध्ये करण्यात आलेल्या एनआरसीमुळे तेथील तब्बल १६ लाख नागरिकांचे नागरिकत्व त्यांच्याकडे असलेल्या अपुºया कागदपत्रांमुळे धोक्यात आले आहे. याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित होणाºया बातम्या तसेच समाजमाध्यमावर व्हायरल होत असलेल्या मेसेजमुळे या सर्व्हेबद्दल नागरिकांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यांच्या मनातील भीती दूर व्हावी, याकरिता हा कार्यक्र म आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्र मात उपस्थित असलेल्यांपैकी ९० टक्के लोकांकडे एनआरसी सर्व्हेत पात्र ठरण्याकरिता आवश्यक कागदपत्रे नसल्याची खळबळजनक बाब उघडकीस आली. यामुळे नागरिकांकडे सध्या असलेली कागदपत्रे एनआरसीसाठी पुरेशी आहेत की नाहीत, याची पडताळणी करण्यासाठी २ आॅक्टोबरला मुंब्य्रातील कौसा परिसरातील सेंट मेरी हायस्कूलमध्ये शिबिर आयोजित करण्यात आले आहे. एनआरसी सर्व्हेपूर्वी पुढील वर्षी १ एप्रिल ते ३० सप्टेंबरपर्यंत राष्ट्रीय जनगणना होणार आहे. यात घरोघरी जाऊन होणाºया नोंदीमध्ये नागरिकांनी त्यांची माहिती द्यावी, असे आवाहन प्रमुख वक्ते डॉ. अल्तमाज फैजी तसेच आयोजक प्रा. हसन मुल्लाणी यांनी केले.

Web Title: Will 90 percent of citizens in NRC survey be disqualified?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.