वाढीव पाण्याचा निर्णय आज होणार?

By admin | Published: March 10, 2016 02:05 AM2016-03-10T02:05:15+5:302016-03-10T02:05:15+5:30

पाणीकपात वाढल्याने नवी मुंबईच्या वाट्याचे कल्याण-डोंबिवलीला मिळणारे पाणी देण्याचा निर्णय जलसंपदा मंत्री गिरीश महाजन गुरूवारी घेणार असल्याची माहिती भाजपच्या माजी नगरसेविका शुभा पाध्ये यांनी दिली

Will the decision of increased water supply be made today? | वाढीव पाण्याचा निर्णय आज होणार?

वाढीव पाण्याचा निर्णय आज होणार?

Next

कल्याण : पाणीकपात वाढल्याने नवी मुंबईच्या वाट्याचे कल्याण-डोंबिवलीला मिळणारे पाणी देण्याचा निर्णय जलसंपदा मंत्री गिरीश महाजन गुरूवारी घेणार असल्याची माहिती भाजपच्या माजी नगरसेविका शुभा पाध्ये यांनी दिली.
मोरबे धरणाचे काम पूर्ण झाल्यावर नवी मुंबईचे १४० दशलक्ष लिटर पाणी कल्याण- डोंबिवलीला देण्याचे तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार यांनी २००९ मध्ये मान्य केले होते. त्याचा जीआर अद्याप निघालेला नाही. यासंदर्भात भाजप नगरसेविका पाध्ये यांनी बुधवारी जलसंपदा मंत्री महाजन यांची भेट घेतली.
महापालिकेला मंजूर पाणी कोटा २३५ दशलक्ष लिटर आहे. महापालिका नदी पात्रातून ३१० दशलक्ष लिटर पाणी उचलते. एमआयडीसीचा मंजूर पाणी कोटा ५८४ दशलक्ष लिटर आहे. एमआयडीसी ७७० दशलक्ष लिटर पाणी उचलते. स्टेम पाणीपुरवठा योजनेचा मंजूर पाणी कोटा २८४ दशलक्ष लिटर आहे. स्टेम २२८ दशलक्ष लिटर पाणी उचलते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणास ९० दशलक्ष लिटर पाणी कोटा मंजूर असून प्राधिकरण १०० दशलक्ष लिटर पाणी उचलते. नवी मुंबईचे जादा पाणी कल्याण-डोंबिवलीला दिल्यास प्रश्न सुटू शकतो.

Web Title: Will the decision of increased water supply be made today?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.