सरकारच ठरवेल अर्थसंकल्प चांगला की वाईट?; चंद्रशेखर टिळक यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2020 01:33 AM2020-02-06T01:33:56+5:302020-02-06T06:22:20+5:30

मराठी ग्रंथसंग्रहालयात बजेटवर केले मार्गदर्शन

Will the government decide whether the budget is good or bad ?; Opinion of Chandrasekhar Tilak | सरकारच ठरवेल अर्थसंकल्प चांगला की वाईट?; चंद्रशेखर टिळक यांचे मत

सरकारच ठरवेल अर्थसंकल्प चांगला की वाईट?; चंद्रशेखर टिळक यांचे मत

Next

ठाणे : आपण आपल्या अर्थकारणाचा विचार करण्याची तसेच इकॉनॉमी सर्व्हे करण्याची संधी यंदाच्या अर्थसंकल्पाने दिली आहे. हा अर्थसंकल्प वेगळा किंवा वाईट म्हणायला वेळ लागेल. कारण, येणाºया काळात सरकार कसे वागते, त्याची अंमलबजावणी कशी होते, यावर हे अवलंबून आहे. अर्थव्यवस्था आम्ही फिरवतोय, तुम्ही फिराल का? एवढेच या अर्थसंकल्पातून सरकार सांगत आहे. अर्थव्यवस्था तरुणही नाही, ती म्हातारीही नाही, ती परिपक्व आहे. अर्थसंकल्पाने काय दिले, हा विचार करण्यापेक्षा अर्थसंकल्प हा मी कसा वापरून घेऊ शकतो, हा विचार केला तर तो तुमच्यासाठी आहे, असे मत सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक यांनी व्यक्त केले.

स्वा. वि.दा. सावरकर प्रतिष्ठानतर्फेकेंद्रीय अर्थसंकल्प २०२०-२१ या विषयावर मंगळवारी मराठी ग्रंथसंग्रहालय येथे जाहीर व्याख्यान आयोजित केले होते. टिळक म्हणाले की, अर्थकारणातही संकेत असतात, पण ते वेळेला कळत नाही. एका पद्धतीने अर्थव्यवस्थेचे चित्र आहे आणि दुसºया अर्थी सरकारवर अवलंबून राहू नये, हे सांगणारा हा अर्थसंकल्प आहे. सरकारने या अर्थसंकल्पात स्वत:ची पायाभरणी कशी करणार, हे सांगितले आहे. या अर्थसंकल्पातून सर्वसामान्य गुंतवणूकदार आणि मध्यमवर्गीय, पगारदार यांनी येणाºया काळात आपल्या गुंतवणुकांचे नियोजन करताना करसवलत हा एकमेव निकष न ठेवता आता परतावा पण लक्षात घेऊन ती करावी, असे आवाहन केले.

नवीन कररचनेचा पर्याय स्वीकारावा की, जुनाच चालू ठेवावा, यावर ते म्हणाले की, करदात्याने आपले वय, आपली जबाबदारी, आपली मिळकत, भविष्यात द्यावा लागणारा कर याचा सखोल अभ्यास करून मगच पर्याय निवडावा. आज भारताचा जीडीपी हा पूर्वीप्रमाणे कृषी आणि उद्योगापेक्षा सेवा क्षेत्रातून जास्त येत असल्यामुळे सरकारनेदेखील या अर्थसंकल्पामध्ये २१ ते ४५ याच वयोगटांतील करदात्यांना नजरेसमोर ठेवून अर्थसंकल्पातील काही तरतुदी केल्या आहेत. शेतकऱ्यांनादेखील त्यांचे उत्पन्न येत्या तीन वर्षांत कसे वाढेल, याचा रोडमॅप आखून दिलेला आहे.

भारताला आपली अर्थव्यवस्था पाच ट्रिलियनची करायची असेल, तर आधी या देशातील नागरिकांना आपला वैयक्तिक जीडीपी वाढवावा लागेल, म्हणजे मग आपोआप देशाची अर्थव्यवस्था पुढील पाच वर्षांत पाच ट्रिलियन होऊ शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एलआयसीचे किती शेअर विकणार, हे सरकारने या अर्थसंकल्पात जाहीर केलेले नसताना इतका आरडाओरडा कशासाठी? असा प्रश्न करून टिळक म्हणाले, त्याच गोष्टी जास्त विकल्या जातात, ज्याची विश्वासार्हता जास्त असते. सरकार स्वत:च्या रिसोर्सेसची पायाभरणी करेल, पण तुमच्या आमच्या खिशाला हात लावणार नाही. अर्थव्यवस्था ही तुमच्या आमच्या चौकटीत राहिलेली नाही. सेवानिवृत्ती जवळ आलेल्यांना ज्या क्षेत्रांची गरज, त्या क्षेत्रांत मंदी आहे. कारण, भविष्यात त्या क्षेत्रांना ग्राहक राहणार नाही.

सुरुवातीला सावरकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष विद्याधर ठाणेकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी व्यावसायिक अशोक जोशी, प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष केदार बापट, वंदना परांजपे, दुर्गेश आकेरकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन निशिकांत महांकाळ यांनी केले.
जागतिक मंदी, ट्रेड वॉरची काळजी घेण्याची गरज जागतिक मंदी, चीन-अमेरिका ट्रेड वॉर, आखाती देशांतील अशांतता या सर्व गोष्टींकडे पण लक्ष देऊन त्याचा आपल्या अर्थव्यवस्थेवर फारसा परिणाम होणार नाही, याचीदेखील काळजी सरकार घेत आहे.

अर्थात, हे एक आव्हान आहे, पण तरी एकूणच हळूहळू येत्या काही वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था ऊर्जितावस्थेकडे नेणारा हा अर्थसंकल्प आहे, असे मत शेअर बाजार अभ्यासक सीए निखिलेश सोमण यांनी व्यक्त केले. करदात्यांनी अभ्यास करावा : दोन महिन्यांत सर्वच करदात्यांनी स्वत: या गोष्टीचा अभ्यास करून कुठल्या गुंतवणुका थांबवल्या पाहिजेत. कुठल्या चालू ठेवल्या पाहिजेत आणि करापोटी रक्कम जास्त जात असल्यास त्याच कराची भरपाई करू शकणाºया गुंतवणुका शोधायला हव्यात.

Web Title: Will the government decide whether the budget is good or bad ?; Opinion of Chandrasekhar Tilak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.