कोपरी उद्याची पाचपाखाडी होणार का? रातोरात बॅनर लागले, कोपरीकरांचे अस्तित्व धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 11:37 PM2022-02-08T23:37:14+5:302022-02-08T23:37:25+5:30

नव्या प्रभाग रचनेमुळे येथील विद्यमान नगरसेवकांना देखील तिकीट मिळविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

Will Kopari be Pachpakhadi tomorrow? Banners were hoisted overnight, endangering Koparikar's existence | कोपरी उद्याची पाचपाखाडी होणार का? रातोरात बॅनर लागले, कोपरीकरांचे अस्तित्व धोक्यात

फोटो- विशाल हळदे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे  : प्रभाग रचना झाली आणि अनेक प्रश्न त्या निमित्ताने उपस्थित होऊ लागले आहेत. कोपरीमध्ये तर तेथील स्थानिकांचे अस्तित्व धोक्यात येण्याची भिती निर्माण झाली आहे. आधी नौपाडय़ाच्या स्वार्थासाठी कोपरी समिती नौपाडय़ात विलीन केली. त्यानंतर आता नव्या प्रभाग रचनेत येथील प्रभागच थेट वागळेला जोडले गेले आहेत. त्यामुळे सध्या येथील सोशल मिडियावर सध्या एक पत्र प्रपंच वायरल झाला असून कोपरी उद्याची पाचापाखाडी होणार का? असा सवाल उपस्थित करीत कोपरीकरांचे अस्तितव्य धोक्यात अशी सुचनाही त्या माध्यमातून देण्यात आली आहे.

येथील काही दक्ष दोघा तिघा मित्रंनी मिळून हा पत्र प्रपंच केला असून त्यामध्ये अनेक महत्वाच्या मुद्यांना वाचा फोडण्याचा प्रयत्न केला आहे. पूव्रेचा इतिहास उभा करीत काल खंडातील बदला नुसार मराठी, कोळी, आगरी, पारशी, सिंधी, बौद्ध , कोकणी, गुजराती, मारवाडी, व इतर सर्व समाज या सर्वांचा मिळून ऐक सुंदर आधूनीक छोटा भारत या परिसरात तयार झाला. ग्राम पंचायत ते नगर पालीका आणी पुढे महानगर पालीका असा ठाणो शहराचा झालेला विकास व त्यात ठाणो पूर्व कोपरी विभागाचे योगदान कदापी विसरता येणार नाही. महापलिकेत रूपांतर झाल्या नंतर ठाणो पूर्वला ख:या अर्थांने विकास काय असतो तो दिसू लागला ठाणो महापालीकेतील रचने प्रमाणो कोपरी प्रभाग समिती अस्तित्वात आली. कधी काळी ९, ८, ६ , नगरसेवक असलेली कोपरी प्रभाग समिती राजकीय फायद्यासाठी ४ नगरसेवकांवर मर्यादीत झाली. पुढे तर कहरच झाला ठाणो पूर्व कडील आनंद नगर , गांधी नगर हा भाग वागळे प्रभाग समितीकडे जोडन्यात आला. कोपरीचा भाग छोटा केल्याने नागरीकांना नाहक त्नास सहन करावा लागत आहे. याच कालखंडा मध्ये कोपरी प्रभाग समिती नष्ट करून नौपाडा प्रभाग समितीमध्ये वर्ग करण्यात आली व कोपरी चे पूर्ण अस्तित्वच संपवण्यात आले. याला जबाबदार कोण ? असा सवाल उपस्थित करीत राजकीय मंडळींकडे अंगली निर्देश करण्यात आला आहे.  

त्यामुळे अशा राजकीय पुढा:यांसाठी कोपरी कर कीती दीवस बांधले जाणार आहोत? असा सवाल उपस्थित करीत ठाणो जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे हे या मतदारसंघाचे प्रतिनिधी करतात या मतदाराचे संघाचे नाव कोपरी पाचापाखाडी म्हणजेच आजची कोपरी उद्याची पाचपाखाडी होणार का? असा खोचक सवाल या निमित्ताने राजकीय मंडळींना उपस्थित करण्यात आला आहे.      

 तरी आमच्या कोपरीच्या नागरीकांना प्रश्न आहे की आपण आपली ओळख अबाधीत ठेवायची की नाही आम्ही तर नक्कीच आवाज उठवणार तुम्ही पण या कोपरी साठी सूजाण नागरीक म्हणून आम्हाला साथ द्या, आपल्या कोपरीचे विभाजन होण्यापासून ठाळूया असे आवाहनही या माध्यमातून करण्यात आले आहे.  

नव्या प्रभाग रचनेमुळे येथील विद्यमान नगरसेवकांना देखील तिकीट मिळविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. सहा नगरसेवकांचे चार नगरसेवक करण्यात आल्याने त्यातही एक प्रभाग कोपरी ते थेट उथळसर्पयत तर एक प्रभाग वागळेला जोडण्यात गेल्याने तिकीट मिळविण्यावरुन येथे चांगलेच खलबते उडणार आहेत. भाजपला शह देण्यासाठी सत्ताधा:यांकडून ही व्युव्हरचना आखण्यात आली आहे. परंतु, त्यामुळे कोपरीकरांचे विभाजन करण्यात आले आहे.

Web Title: Will Kopari be Pachpakhadi tomorrow? Banners were hoisted overnight, endangering Koparikar's existence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.