कल्याण परिमंडळात दोन लाख ग्राहकांचा वीजपुरवठा होणार खंडित?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:47 AM2021-09-24T04:47:38+5:302021-09-24T04:47:38+5:30

डोंबिवली : कल्याण परिमंडळात तीन आठवड्यांत वीजबिल थकबाकीपोटी जवळपास ४२ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. याखेरीज आणखीही थकबाकी ...

Will power supply to two lakh customers be disrupted in Kalyan? | कल्याण परिमंडळात दोन लाख ग्राहकांचा वीजपुरवठा होणार खंडित?

कल्याण परिमंडळात दोन लाख ग्राहकांचा वीजपुरवठा होणार खंडित?

Next

डोंबिवली : कल्याण परिमंडळात तीन आठवड्यांत वीजबिल थकबाकीपोटी जवळपास ४२ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. याखेरीज आणखीही थकबाकी असणारे दोन लाख एक हजार ३२ वीजग्राहक रडारवर असून त्यांचा वीजपुरवठा कधीही खंडित केला जाऊ शकतो.

चालू वीजबिलासह थकबाकीचा भरणा करून कठीण आर्थिक परिस्थितीत असलेल्या महावितरणला सहकार्य करून अखंडित वीज सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन गुरुवारी मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांनी केले. थकबाकीदारांकडून वीजबिलाची वसुली अथवा त्यांचा वीजपुरवठा खंडित करणे, हे दोनच पर्याय वीज कर्मचाऱ्यांसमोर आहेत. घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीतील ५०० रुपयांपेक्षा अधिकची थकबाकी असलेले दोन लाखांहून अधिक ग्राहक असल्याचे महावितरणने गुरुवारी प्रसिद्धिपत्रकाद्वारे जाहीर केले.

सप्टेंबर महिन्यापूर्वी एक लाख ६५ हजार थकाबाकीदारांचा शिवाय ३३१ पाणीपुरवठा योजना व ७८६ पथदिवे जोडण्यांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. तीन आठवड्यांत कल्याण मंडळ एक (कल्याण व डोंबिवली) अंतर्गत पाच हजार ४६५, कल्याण मंडळ दोन (उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, शहापूर, ठाणे जिल्ह्याचा ग्रामीण भाग) अंतर्गत सात हजार ९७२, वसई मंडळ (वसई व विरार) अंतर्गत १३ हजार २१४ आणि पालघर मंडल (वसई व विरार वगळून उर्वरित पालघर जिल्हा) अंतर्गत १५ हजार २५० ग्राहकांचा तसेच २५ पाणीपुरवठा योजना व १४९ पथदिवे जोडणीचा वीजपुरवठा खंडित केला होता. यातील २० हजार २११ ग्राहकांनी चालू वीजबिलासह थकबाकी आणि पुनर्जोडणी शुल्काचा भरणा करून वीजपुरवठा सुरळीत करून घेतला आहे.

कल्याण परिमंडळात सर्व वर्गवारीतील सहा लाख ७२ हजार ग्राहकांकडे ६६९ कोटी रुपयांचे वीजबिल थकीत आहे. या थकबाकीदार ग्राहकांनी तातडीने वीजबिल भरून महावितरणला संकटाच्या काळात सहकार्य करण्याचे आवाहन औंढेकर यांनी केले आहे.

*विजेचा अनधिकृत वापर टाळा*

वीजपुरवठा खंडित केल्यानंतर चालू वीजबिल व थकबाकी तसेच पुनर्जोडणी शुल्क भरल्याशिवाय वीजपुरवठा पूर्ववत केला जाणार नाही. थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. या ग्राहकांनी शेजारून अथवा परस्पर जोडणी किंवा अन्य माध्यमातून विजेचा अनधिकृत वापर केल्याचे आढळल्यास थेट कारवाई करण्यात येणार आहे. याची सर्व वीज ग्राहकांनी नोंद घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे

----

Web Title: Will power supply to two lakh customers be disrupted in Kalyan?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.