धिम्या मार्गावरील बोगद्यानजीकचे खांब हटवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 02:43 PM2019-03-02T14:43:15+5:302019-03-02T14:43:33+5:30

मुंब्य्राहून ठाण्याच्या दिशेने जाणार्‍या धिम्या मार्गावरील बोगद्यानजीक असलेल्या खांबांमुळे अपघातांची संख्या वाढत असल्याने हे खांब हटवून दूर लावण्यात येणार असल्याचे आश्वासन रेल्वेचे विभागिय अभियंते एच.एस. चतुर्वेदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाला दिले.

Will remove erosion pillars on the narrow lane | धिम्या मार्गावरील बोगद्यानजीकचे खांब हटवणार

धिम्या मार्गावरील बोगद्यानजीकचे खांब हटवणार

Next

ठाणे : मुंब्य्राहून ठाण्याच्या दिशेने जाणार्‍या धिम्या मार्गावरील बोगद्यानजीक असलेल्या खांबांमुळे अपघातांची संख्या वाढत असल्याने हे खांब हटवून दूर लावण्यात येणार असल्याचे आश्वासन रेल्वेचे विभागिय अभियंते एच.एस. चतुर्वेदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाला दिले. दरम्यान, मुंब्रा स्टेशन येथील नव्याने होत असलेल्या तीन व चार क्रमांकांच्या फलाटांना जोडणार्‍या पुलाचे काम 31 मार्चपर्यंत पूर्ण करुन हा पुल जनतेसाठी खुला करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
गेल्या आठवडाभरात धिम्या मार्गावरील दुसर्‍या बोगद्यानजीक असलेल्या खांबांना धडक लागून 4 तरुण आणि एका महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली ब्लॉक अध्यक्ष बबलू शेमणा यांच्या नेतृत्वाखाली सलीम खान, रियाझ खान, इक्बाल घाणीवाला, शकील अन्सारी, सय्यद सलीम, रशीद काद्री या शिष्टमंडळाने रेल्वेचे  विभागिय अभियंते एच.एस. चतुर्वेदी आणि कार्यकारी अभियंते रिझवान अहमद यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी अपघात रोखण्यासाठी सदरचे खाब हटवण्याची मागणी केली. “सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी जर एखादी गाडी रद्द झाली तर चाकरमानी मिळेल त्या गाडीने प्रवास करीत असतात. यामुळे दरवाजात लटकल्याने खांबावर आदळून अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे,” असे शेमणा यांनी निदर्शनास आणून दिले.   त्यावर अहमद यांनी हे खांब हटवण्याचा प्रयत्न करण्यात येईल. जे ते शक्य झाले नाही तर  रेल्वे रुळांपासून ते दूर उभारण्यात येतील, असे आश्वासन दिले. तसेच, जो पर्यंत हे खांब हटटवण्यात येत नाहीत; तोपर्यंत या खांबानजीकच्या वळणावर ही गाडी हळू चालवण्याच्या सूचना मोटटरमेनला देण्यात येतील, असे सांगितले.
दरम्यान. 3 आणि चार क्रमांकाच्या फलाटांचे काम, रेल्वे पुलाचे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. तर, सरकत्या जिन्यांची निविदाप्रक्रियाही सुरु करण्यात आली असल्याचेही अहमद आणि चतुर्वेदी यांनी सांगितले.

Web Title: Will remove erosion pillars on the narrow lane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे