पुन्हा शिवसेना गड राखणार की, मनसेचे इंजीन धावणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 01:31 AM2019-10-16T01:31:42+5:302019-10-16T01:32:31+5:30

२०१४ सालच्या निवडणुकीत शिवसेनेचे सुभाष भोईर हे निवडून आले होते. त्यामुळे मनसेला विजयाचे सातत्य राखता आले नाही.

Will the Shiv Sena maintain the fort again, will the MNS engine run? | पुन्हा शिवसेना गड राखणार की, मनसेचे इंजीन धावणार?

पुन्हा शिवसेना गड राखणार की, मनसेचे इंजीन धावणार?

googlenewsNext

मुरलीधर भवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कल्याण ग्रामीण मतदारसंघातून शिवसेनेचे रमेश म्हात्रे यांचा सामना मनसेचे उमेदवार राजू पाटील यांच्यासोबत होणार आहे. शिवसेनेचे विद्यमान आमदार सुभाष भोईर यांची उमेदवारी कापून त्यांच्या जागी म्हात्रे यांना उमेदवारी दिली आहे. २००९ साली राजू पाटील यांचे मोठे भाऊ रमेश पाटील यांनी रमेश म्हात्रे यांचा पराभव केला होता. तेव्हाही म्हात्रे हे शिवसेनेचे उमेदवार होते. २००९ साली मनसेचे इंजीन कल्याण ग्रामीणमध्ये घुसले होते.

मात्र, २०१४ सालच्या निवडणुकीत शिवसेनेचे सुभाष भोईर हे निवडून आले होते. त्यामुळे मनसेला विजयाचे सातत्य राखता आले नाही. २०१५ सालापासून महापालिकेत समाविष्ट केलेल्या २७ गावांचा मुद्दा गाजतो. स्वतंत्र नगरपालिकेच्या मागणीसाठी सरकारकडून आश्वासन दिले जात आहे. तसेच २७ गावे व नवी मुंबईतून वगळलेली १४ गावे आणि दिव्याच्या विकासाचा मुद्दा आहे. त्याचबरोबर या गावांना जोडणाऱ्या कल्याण-शीळ रोडवरील वाहतूककोंडीचा मुद्दाही महत्त्वाचा आहे. या मुद्याभोवती या मतदारसंघात म्हात्रे विरुद्ध पाटील यांच्यात खरा सामना रंगला आहे. तो निश्चितच पाहण्यासारखा असेल.

जमेच्या बाजू
शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक आहेत. स्थायी समिती सभापतीचे पद चारवेळा भूषविले आहे. महापालिकेच्या महासभेत आरोग्य, बीएसयूपीची घरे, पाणीटंचाई या प्रश्नांवर प्रशासनाला धारेवर धरले. नगरसेवकपदाचा दांडगा अनुभव. त्यांच्या पत्नीदेखील नगरसेविका आहेत. २७ गावांच्या विकासासाठी आग्रही आहेत. प्रदूषणाच्या मुद्यावर त्यांनी अधिकाºयाना घेरले होते. निवडणुकीचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे.
२००९ ते २०१४ या कालावधीत त्यांचे भाऊ रमेश पाटील हे या मतदारसंघाचे मनसेचे आमदार होते. २०१४ साली राजू पाटील यांनी मनसेच्या वतीने कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली आहे. त्यामुळे त्यांच्या गाठीशी निवडणुकीचा अनुभव आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रिय आहेत. राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे. राज ठाकरे यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे यशाचा दावा करीत आहेत.

उणे बाजू
स्पष्टवक्तेपणा हा गुण आहे. पण, राजकारणात काही वेळेस तो सगळ्यांनाच रूचत नाही. २७ गावे वेगळी करण्याच्या मुद्यावर सर्वपक्षीय संघर्ष समिती ठाम असताना शिवसेनेने ही गावे महापालिकेत समाविष्ट आहेत, त्यामुळे ती राहू द्यावीत. वेगळी करू नयेत, ही आग्रही भूमिका घेतली. पक्षाची ही भूमिका कदाचित त्रासदायक ठरू शकते. २७ गावांतील वेगळ्या नगरपालिकेचा मुद्दा हा शिवसेनेला मान्य नाही.
पक्षाचे नेतेपद त्यांच्याकडे असूनदेखील पक्षाच्या अनेक स्थानिक कार्यक्रमांना ते उपस्थिती लावत नाहीत. पक्षाच्या कार्यक्रमातील प्रसिद्धीपासून ते दूर राहणे पसंत करतात. त्यांच्या संपर्काचा मुद्दा पक्षात चर्चिला जातो. पदाधिकाऱ्यांचेही फोन घेत नाहीत, असे पदाधिकारीच सांगतात. व्यवसायानिमित्त परदेशी दौºयावर असतात. त्यामुळे कार्यकर्त्यांना सहज उपलब्ध होत नाहीत, अशी तक्रार आहे.

Web Title: Will the Shiv Sena maintain the fort again, will the MNS engine run?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.