शिवरायांच्या शिल्पाचे काम वादग्रस्त ठेकेदाराला देणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 11:48 PM2019-12-16T23:48:44+5:302019-12-16T23:49:12+5:30

महापालिकेत चर्चेला उधाण : मराठा क्रांती मोर्चाने केला विरोध

Will Shivarai's sculpture work for controversial contractor? | शिवरायांच्या शिल्पाचे काम वादग्रस्त ठेकेदाराला देणार?

शिवरायांच्या शिल्पाचे काम वादग्रस्त ठेकेदाराला देणार?

googlenewsNext

ठाणे : ठाणे महानगरपालिका मुख्यालयावरील शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणाऱ्या सद्य:स्थितील शिल्पचित्राची वारंवार डागडुजी न करता नव्याने संकल्पचित्र बनवून ते तयार करावे, अशी मागणी सकल मराठा क्र ांती मोर्चाच्या मागणीनंतर महापौरांच्या आदेशानुसार प्रशासनाने नामवंत शिल्पकारांकडून निविदा मागविल्या आहेत. मात्र, हे कामदेखील थीम पार्क आणि बॉलिवूड पार्कचे काम करणाºया वादग्रस्त ठेकेदाराला देण्याचा घाट प्रशासन आणि सत्ताधारी पक्षातील काहींनी घातला असल्याची चर्चा आहे.


सोमवारी यासाठी निविदा भरण्याचा अंतिम दिवस होता. त्यानुसार, ‘त्या’ वादग्रस्त ठेकेदाराने सोमवारी पालिकेत हजेरी लावल्याने हे प्रकरण अधिक पेटले असून मराठा क्रांती मोर्चाने त्यास विरोध केला आहे.
महापौरांच्या सूचनेनंतर शिवरायांचे संकल्पचित्र तयार करण्यासाठी या क्षेत्रातील दिग्गज कलादिग्दर्शक, चित्रकार, शिल्पकार यांच्याकडून निविदा मागविल्या. सोमवारी निविदा भरण्याची अंतिम तारीख होती. परंतु, याच दिवशी महापालिका मुख्यालयात थीम पार्कच्या वादग्रस्त ठेकेदाराने पालिकेत हजेरी लावली. त्यामुळे त्यालाच हे काम देण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप आता होऊ लागला आहे.
एकीकडे थीम पार्क आणि बॉलिवूड पार्कच्या कामांची चौकशी सुरू असताना ठेकेदारावर कारवाईची मागणी केली जात असताना पुन्हा पालिकेने त्याच्यासाठी ग्रीन कार्पेट अंथरल्याची चर्चा सुरू झाली आहे.


दुसºयाच्या नावाने निविदा
थीम पार्क घोटाळ्यातील ठेकेदार जरी प्रत्यक्षात यामध्ये समोर नसला, तरी दुसºया नावाने त्याने निविदा भरल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्यामुळे नेमका हा प्रकार काय, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

आधीच त्या ठेकेदाराने पालिकेला बुडविले आहे. असे असताना पुन्हा त्यालाच काम देण्याचा घाट घातला जात असेल, तर ज्या अधिकाऱ्यांकडून असा प्रकार घडत असेल, त्यांच्या तोंडाला काळे फासले जाईल.
- रमेश आंब्रे, सकल मराठी समाज, प्रतिनिधी

पालिकेच्या माध्यमातून नियमानुसार आॅनलाइन निविदा प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे ठरावीक एका ठेकेदाराला काम देण्याचा प्रश्नच शिल्लक राहत नाही.
- रवींद्र खडताळे, नगरअभियंता, ठामपा

Web Title: Will Shivarai's sculpture work for controversial contractor?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.