प्रतिदिन १० टन कचऱ्याचे करणार वर्गीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:26 AM2021-07-11T04:26:48+5:302021-07-11T04:26:48+5:30

ठाणे : कचरावेचक महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा व सुक्या कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट व्हावी म्हणून समर्थ भारत व्यासपीठाने सुरू केलेल्या ...

Will sort 10 tons of waste per day | प्रतिदिन १० टन कचऱ्याचे करणार वर्गीकरण

प्रतिदिन १० टन कचऱ्याचे करणार वर्गीकरण

googlenewsNext

ठाणे : कचरावेचक महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा व सुक्या कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट व्हावी म्हणून समर्थ भारत व्यासपीठाने सुरू केलेल्या प्रकल्प पुनर्निर्माण केंद्राचे अत्याधुनिकीकरण करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ हिरानंदानी व एका खासगी कंपनीने यासाठी आर्थिक सहकार्य केले आहे. यामुळे आता प्रतिदिन १० टन कचऱ्याचे वर्गीकरण करणे शक्य होणार आहे.

ओल्या कचऱ्याचे खत व सुका कचरा शास्त्रोक्त विल्हेवाटीसाठी पाठविणे काळाची गरज झाली आहे. ठाणे महापालिका प्रदूषण नियंत्रण कक्ष व समर्थ भारत व्यासपीठाने कोपरी मल:निस्सारण केंद्र येथे दाेन वर्षांपूर्वी प्रकल्प पुनर्निर्माण केंद्र सुरू केले. लोकसहभागातून नागरिकांच्या घराघरांतील सुका कचरा संकलित करणे व हा कचरा कचरावेचक महिलांकडून वर्गीकरण करून शास्त्रोक्त विल्हेवाट करण्यासाठी पाठविणे अशा स्वरूपाचे काम प्रकल्प पुनर्निमाणअंतर्गत होत आहे. शहरातील ५० हजारांहून अधिक घरांतील कचरा संकलित होत आहे. वाढत्या कचऱ्याच्या अनुषंगाने सुका कचरा व्यवस्थापन प्रक्रिया केंद्राचे यांत्रिक आधुनिकीकरण आवश्यक होते. या केंद्रात वर्गीकरणासाठी कन्व्हेअर बेल्ट, प्लास्टिकचे आकारमान कमी करण्यासाठी बेलिंग मशीन व जवळपास तीन हजार फुटांचे प्रक्रिया केंद्र शनिवारी रोटरीचे ३१४२ डिस्ट्रिक्ट गव्हर्नर बी. एम. शिवराज, समर्थ भारत व्यासपीठाचे संचालक उल्हास कार्ले, रोटरी क्लब ऑफ हिरानंदानीचे अध्यक्ष रवी शंकर, प्रकल्पाध्यक्ष प्रदीप नायर, सचिव अनिल रायचूर यांच्या प्रमुख उपस्थितीत उद‌्घाटन करण्यात आले.

ॲपद्वारे सहभाग शक्य

‘प्रकल्प पुनर्निर्माण’ हा महाराष्ट्रातील सुका कचरा व्यवस्थापनातील एक पथदर्शी प्रकल्प आहे. जवळपास ५० हजारांहून अधिक घरांचा कचरा घंटागाडीत न जाता थेट वर्गीकरण केंद्रावर पाठविला जातो. चार महिन्यांत ही संख्या एक लाख घरांपर्यंत नेण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. अत्याधुनिक वर्गीकरण मशीनमुळे आता ते शक्य होणार आहे. ‘रिसायकल अर्थ’ नावाच्या ॲपद्वारे नागरिक या सुका कचरा संकलन मोहिमेत सहभागी होऊ शकतात. प्रकल्पाची क्षमता वाढल्याने जास्तीत जास्त कचरावेचक महिलांना रोजगार देणे व अधिकाधिक कचरा शास्त्रोक्त विल्हेवाटीसाठी पाठविणे शक्य होणार आहे.

Web Title: Will sort 10 tons of waste per day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.