टेंभा आश्रमशाळा दहीगाव येथे हलवणार? शासकीय अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींनी घातला घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 06:33 AM2017-08-21T06:33:42+5:302017-08-21T06:33:42+5:30

टेंभा आश्रमशाळा राज्य सरकारच्या मास्टर प्लाननुसार मंजूर असूनदेखील केवळ टेंभा गावात वनविभागाची जागा उपलब्ध नसल्याचा अजब शोध लावून ही शाळा दहीगाव येथील वनविभागाच्या जागेत हलवण्याचा घाट शासकीय अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींनी घातला आहे.

 Will Tembh Ashram Shala move to Dahegaon? Government officials and people's representatives gathered in the valley | टेंभा आश्रमशाळा दहीगाव येथे हलवणार? शासकीय अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींनी घातला घाट

टेंभा आश्रमशाळा दहीगाव येथे हलवणार? शासकीय अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींनी घातला घाट

Next

आसनगाव : टेंभा आश्रमशाळा राज्य सरकारच्या मास्टर प्लाननुसार मंजूर असूनदेखील केवळ टेंभा गावात वनविभागाची जागा उपलब्ध नसल्याचा अजब शोध लावून ही शाळा दहीगाव येथील वनविभागाच्या जागेत हलवण्याचा घाट शासकीय अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींनी घातला आहे. मात्र, टेंभा ग्रामपंचायतीने याला विरोध केला असून याबाबतचे लेखी निवेदन आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा आणि शहापूरचे आदिवासी विकास प्रकल्प अधिकाºयांना देऊन ही शाळा टेंभा गावातून न हलवण्याची मागणी केली आहे.
टेंभा परिसरातील शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत १० वर्षांपूर्वी तत्कालीन आ. महादू बरोरा यांच्या प्रयत्नाने टेंभा येथे निवासी शासकीय आश्रमशाळा मंजूर केली. सध्या येथे ३५० विद्यार्थी शिकत आहेत.
वास्तविक, जीआरप्रमाणे मास्टर प्लाननुसार मंजूर झालेली आश्रमशाळा इतर ठिकाणी हलवता येत नाही. येथे जागा उपलब्ध नसल्यास वनविभागाची जागा ३/२ च्या प्रस्तावानुसार उपलब्ध करून जागेची अडचण सोडवता येते. मग, टेंभा येथे वनविभागाची शेकडो एकर जागा उपलब्ध असतानाही ही आश्रमशाळा दहीगाव येथे हलवण्याचा घाट का घातला जातो आहे, असा संतप्त सवाल टेंभा ग्रामपंचायतीचे उपसरपंच एकनाथ कोर यांनी केला.

दहीगाव येथे वनविभागाच्या ज्या जागेत शासनाने टेंभा येथील आश्रमशाळा हलवण्याचे ठरवले, तेथे जागा संपूर्ण खडकाळ असून सदर ठिकाणी पाणीपुरवठ्यासाठी विहीर किंवा बोअरवेलदेखील लागणार नाही, मग शासन टँकरने पाणीपुरवठा करणार का.
- दीपक सापळे,
सदस्य, दहीगाव ग्रामपंचायत

टेंभा येथील आश्रमशाळा दहीगाव येथे हलवण्यात आल्यास सर्व आदिवासी पालकांसह ग्रामपंचायत सभासद आंदोलन करतील.
- प्रकाश आमले,
सदस्य, टेंभा ग्रामपंचायत

Web Title:  Will Tembh Ashram Shala move to Dahegaon? Government officials and people's representatives gathered in the valley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.