शिवाजी चौकात प्रसाधनगृह मिळेल का?; मुरबाडकरांची व्यथा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 12:09 AM2018-08-22T00:09:17+5:302018-08-22T00:09:38+5:30
नवीन नाही तर जुने तरी दुरूस्त करण्याची मागणी
मुरबाड : मुरबाड शहर हे तालुक्याचे ठिकाण असल्याने दररोज शेकडो नागरिक कामानिमित्त येथे येत असतात. मात्र, या शहरात नगर पंचायतीचे शौचालय नसल्याने नागरिकांना पोलीस स्टेशन जवळील शिवाजी चौकात ही सोय उपलब्ध होईल का, असा प्रश्न नागरिक करत आहेत.
शहराच्या मध्यभागी शिवाजी चौकात पोलीस ठाणे, पंचायत समितीचा बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग, बँक आहे तसेच मच्छी मार्केट देखील आहे. येथे शेकडो नागरिकांची ये - जा असते. परंतु, येणाऱ्या नागरिकांसाठी मूलभूत सोय देखील प्रशासनाने केलेली नाही. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होते आहे. महिलांची कुचंबणा होते आहे.
या भागात पूर्वी ग्रामपंचायतीचे कार्यालय होते. त्याच्या शेजारीच शौचालय होते. मात्र, शहराचा कारभार नगरपंचायतीकडे गेला आणि त्याची देखील दुरवस्था झाली. नवीन देता आले नाही तर तर जुने तरी दुरूस्त करा, अशी मागणी येथील व्यापाºयांनी केली आहे.