कल्याणच्या टिना जैन-चौधरी ठरल्या मिसेस इंडिया होममेकर सौंदर्य स्पर्धेची विजेत्या  

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2017 04:31 PM2017-11-19T16:31:35+5:302017-11-19T16:31:57+5:30

कल्याणातील टिना जैन-चौधरी यांनी दिल्ली गुडगाव येथे झालेल्या मिसेस इंडिया होममेकर या सौंदर्य स्पर्धेत विजेतेपद पटकावत कल्याणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. 

Winner of Tina Jain-Chaudhary, winner of Kalyan, Miss India India Homemaker beauty pageant |  कल्याणच्या टिना जैन-चौधरी ठरल्या मिसेस इंडिया होममेकर सौंदर्य स्पर्धेची विजेत्या  

 कल्याणच्या टिना जैन-चौधरी ठरल्या मिसेस इंडिया होममेकर सौंदर्य स्पर्धेची विजेत्या  

googlenewsNext

कल्याण- कल्याणातील टिना जैन-चौधरी यांनी दिल्ली गुडगाव येथे झालेल्या मिसेस इंडिया होममेकर या सौंदर्य स्पर्धेत विजेतेपद पटकावत कल्याणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. 
    आयझा नाझ-जोशीतर्फे आयोजित या सौंदर्यस्पर्धेत टिनाने ‘एमएस’ विभागात महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करताना या विजेता पदाला गवसणी घातली. तसेच आपल्या संभाषण कौशल्याच्या बळावर तिने या स्पर्धेतील ‘बेस्ट इंटरव्ह्यूअर’चा बहुमान ही मिळविला आहे. मिसेस, क्लासिक आणि एमएस अशा तीन गटात ही स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत 4क् सौंदर्यवतीने सहभाग घेतला होता. त्यात कल्याणत इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय करणा:या टिना यांचा देखील समावेश होता. या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेतील विजयामुळे पुढील वर्षी जून महिन्यात होणा:या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये टिना भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे. यावर्षी झालेल्या मिसेस महाराष्ट्र स्पर्धेतील विजेतेपदावरही टिनाने आपले नाव कोरले आहे. त्यामुळे साहजिकच पुढील वर्षी होणा:या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी टिनाक डे मोठया आशेने पाहिले जात आहे. 
    टिनाने कल्याणातील मराठी माध्यमाच्या सुभेदारवाडा शाळेतून आपले दहावीचे शिक्षण घेतले असून तिने इंजिनिअरींगमधील बी.ई. कॉम्प्युटर पदवी ही प्राप्त केली आहे. तर गेल्या काही वर्षापासून इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय यशस्वीपणो सांभाळणारी टिना सध्या फॅशन जगतात आपले नशीब आजमावत आहे. टिनाच्या या गगनभरारीमुळे सर्वच स्तरातून तिच्यावर अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे. 
    टिनाने आपल्या यशाविषयी सांगताना म्हणाली, एखाद्या महिलेने जर मनाशी ठाम निश्चय केला तर ती कोणतेही अशक्य ध्येय साध्य करू शकते. आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी आपण पूर्णपणो तयार असल्याचे ही तिने सांगितले. 

Web Title: Winner of Tina Jain-Chaudhary, winner of Kalyan, Miss India India Homemaker beauty pageant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.