पथदिवे दुरुस्तीचे काम करताना वायरमनचा मृत्यू, गतवर्षीच पत्नीचेही झाले निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2021 19:33 IST2021-07-30T19:33:12+5:302021-07-30T19:33:32+5:30
उल्हासनगर महापालिकेचा विद्युत विभाग दक्ष व कर्तव्यदक्ष साठी ओळखले जाते. आजपर्यंत विभागावर कोणताही आरोप झाला नाही. मात्र, शुक्रवारी विभागाचे काही वायरमन कॅम्प नं-३ फॉरवर्ड लाईन रस्त्यावरील पदपथ लाईटची दुरुस्ती करीत होते.

पथदिवे दुरुस्तीचे काम करताना वायरमनचा मृत्यू, गतवर्षीच पत्नीचेही झाले निधन
उल्हासनगर : येथील कॅम्प नं-३ फॉरवर्ड लाईन चौक परिसरातील पदपथ लाईटच्या दुरुस्तीचे काम करीत असताना, विजेचा जोरदार धक्का बसून वायरमन दिलीप मोहिले यांचा मृत्यू झाला. महापालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी व उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी मृत वायरमनच्या कुटुंबाला मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
उल्हासनगर महापालिकेचा विद्युत विभाग दक्ष व कर्तव्यदक्ष साठी ओळखले जाते. आजपर्यंत विभागावर कोणताही आरोप झाला नाही. मात्र, शुक्रवारी विभागाचे काही वायरमन कॅम्प नं-३ फॉरवर्ड लाईन रस्त्यावरील पदपथ लाईटची दुरुस्ती करीत होते. दुपारी १ वाजण्याच्यासुमारास दिलीप मोहिले-५४ यांना विजेचा जोरदार धक्का बसून त्यांचा जागीच मृत्यू झाला. मध्यवर्ती रुग्णालयात मोहिले यांना नेले असता, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
दरम्यान, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता हनुमंत खरात यांनी याप्रकाराबाबत दुःख व्यक्त केले. आयुक्त डॉ राजा दयानिधी, उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी मृत वायरमन दिलीप मोहिले यांच्या कुटुंबाला नियमानुसार सर्व मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मृत दिलीप मोहिले यांना दोन मुले असून पत्नी गेल्याच वर्षी मृत्यू झाली आहे.