उल्हासनगरात विजेच्या धक्क्याने वायरमनचा मृत्यू
By सदानंद नाईक | Published: June 13, 2024 04:04 PM2024-06-13T16:04:28+5:302024-06-13T16:04:37+5:30
खंडित झालेला विधुत पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे वायरमन उज्वल घणेकर हे बुधवारी दुपारी दीड एका विजेचा खांबावर चढले.
उल्हासनगर : कॅम्प नं-४, लालचक्की परिसरात दुपारी दिड वाजता विधुत खांबावर चढलेले वायरमन उज्वल घणेकर यांना विजेचा धक्का बसून त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर गुरवारी सकाळी राहत्या गावी भुसावळ येथे अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त कार्यकारी अभियंता जितेंद्र फुलपगारे यांनी दिली आहे.
उल्हासनगर पूर्वेतील लालचक्की विभागात बुधवारी वीज पुरवठा खंडित झाला होता. खंडित झालेला विधुत पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे वायरमन उज्वल घणेकर हे बुधवारी दुपारी दीड एका विजेचा खांबावर चढले. विधुत खांबावर दुरुस्तीचे काम करीत असतांना अचानक त्यांना विजेचा धक्का बसून खाली कोसळले.
स्थानिक नागरिक व सहकारी कर्मचाऱ्यांनी त्यांना मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी हलविले. मध्यवर्ती डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित करण्यात आले. त्यांचा मृतदेह कुटुंबाकडे दिल्यावर त्याच्या मृतदेहवर मुळगाव भुसावळ येथे गुरवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
महावितरणच्या सेवेत असतांना मृत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला त्वरित एका महिन्याचे वेतन दिले जाते. तसेच त्यांच्या कुटुंबातील एका वारसदार यांना महावितरण मध्ये नोकरी मिळणार आहे. तसेच इतर लाभ मिळणार असल्याची माहिती अतिरिक्त कार्यकारी अभियंता जितेंद्र घणेकर यांनी दिली. याबाबत अधिक तपास विठ्ठलवाडी पोलीस करीत आहेत.